शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धनातून समाधान मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:15 IST

दैनंदिन कामाव्यतिरिक्त मानवी जीवनात मुलभूत फरक पाडणारे जलसंवर्धनाचे काम करून समाधान मिळवा. यासाठी पाणी फाउंडेशनच्या कामास प्राधान्य द्या, असे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले.

ठळक मुद्देस्वप्नील तांगडे : वॉटर कप स्पर्धेसाठी ग्रामसेवक, सरपंचांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दैनंदिन कामाव्यतिरिक्त मानवी जीवनात मुलभूत फरक पाडणारे जलसंवर्धनाचे काम करून समाधान मिळवा. यासाठी पाणी फाउंडेशनच्या कामास प्राधान्य द्या, असे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात तहसील कार्यालय व पाणी फाउंडेशनच्या वतीने ग्रामसेवक, सरपंच व कृषीसेवक यांची कार्यशाळा पार पडली. त्यावेळी उपविभागीय अधिकारी तांगडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते. तहसीलदार सचिन शेजाळ, तालुका कृषी अधिकारी अशोक भवरे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळी, अशोक बगाडे आदी यावेळी उपस्थित होते.गावगावात भूजलस्तर वाढविण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यसंपादनाचे काम करण्यात स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन तांगडे यांनी केले. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून मूल्यांकन पद्धत समजून घेऊन गाव व तालुका पाणीदार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती करण्यात पुढाकार घेऊन जलचळवळ निर्माण करू. यासाठी स्वयंसेवी संस्था व गावातील दानशूर व्यक्तीची मदत प्रशासन म्हणून सर्वतोपरी मदत करण्यात येइल, असे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.ग्रामसेवक, सरपंच यांना तालुका कृषी अधिकारी अशोक भवरे, जिल्हा समन्वयक संतोष गवळी यांनी मार्गदर्शन केले. वडगावचे सरपंच दिनेश कटनकर, पंकज तिवारी, बाबाराव राठोड, गजानन खोडे, नीलिमा घोटेकर आदी सरपंचांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक अश्विनी दवारे यांनी केले. सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. तर आभार चंदन सावते यांनी मानले.