शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रूढी आणि परंपरेच्या जोखडातून मुक्त व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 21:29 IST

महिला शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने ज्ञानी झाल्या पाहीजे, याकरिता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड खास्ता खाल्ल्या. त्यांचे विचार संबंध महिलांना आजही प्रेरणादायी असून ते १00 टक्के स्वीकारून स्त्रियांनी अनिष्ट रूढी, परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचे आवाहन सुनंदा वालदे यांनी केले.

ठळक मुद्देसुनंदा वालदे : दारव्हात सावित्राबाई जयंतीनिमित्त प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : महिला शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने ज्ञानी झाल्या पाहीजे, याकरिता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड खास्ता खाल्ल्या. त्यांचे विचार संबंध महिलांना आजही प्रेरणादायी असून ते १00 टक्के स्वीकारून स्त्रियांनी अनिष्ट रूढी, परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचे आवाहन सुनंदा वालदे यांनी केले.येथील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे प्रांत उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे होते. तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष सुकुमार पेटकुले, विठ्ठलराव नाकतोडे, कवी मधुकर बावलकर, प्राचार्य दत्तात्रय राहाणे, माळी महासंघाचे उपाध्यक्ष अविनाश घाटे, डॉ. वसंत उमाये, डॉ. राजेश चौधरी, तालुकाध्यक्ष राजेंद्र घाटे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना उडाखे, डॉ. संतोष कोरडे, सुनिता शेंदुरकर, रवी नरटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, सुकुमार पेटकुळे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.यानिमित्त शहरातून सामाजिक संदेश देणारी रॅली काढण्यात आली. जीवन काळे यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या चित्ररथावरील सावित्रीबार्इंची शाळा लक्षवेधी ठरली. फुले दांम्पत्याच्या वेषातील तृप्ती इंगोले, वैष्णवी ढाकुलकर, दुधगाव येथील फुलेंच्या रांगोळीचे प्रचंड कौतुक झाले.मुलींची पहिली शाळा भिवेवाडा राष्ट्रीय स्मारक झालेच पाहिजे, अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले. तालुका संघटक विनोद शेंदूरकर, सुनील आरेकर, गणेश जवके, पुरुषोत्तम चंचलकर, सुनिता चौधरी, पुष्पाताई राऊत, प्रमोद राऊत, सुखदेव साबळे, विलास गाडे, विलास राऊत, प्रकाश ठाकरे, राजेश ढगे, राजू हळदे, पांडुरंग किरणापुरे, धनंजय काटकर, निरंजन घोडे, चेतन इंगोले, अमोल घाटे, गोपाल माधनकर आदींनी परिश्रम घेतले.