शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत झुंबड

By admin | Updated: July 27, 2016 00:38 IST

पीक विमा काढण्यासाठी अवघे चार दिवस उरले असल्याने उमरखेड शहरासह तालुक्यातील विविध बँकांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.

प्रमाणपत्रासाठी पायपीट : अवघे चारच दिवस उरल्याने उमरखेडच्या शेतकऱ्यांची उडाली धांदल उमरखेड : पीक विमा काढण्यासाठी अवघे चार दिवस उरले असल्याने उमरखेड शहरासह तालुक्यातील विविध बँकांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. बँकांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसून शेतकरी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. सर्वाधिक गर्दी जिल्हा बँकांच्या शाखेत दिसत आहे. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढतात. यावर्षी पीक विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता बँकांमध्ये झुंबड केली आहे. दरवर्षी सातबाराचा उतारा, आठ अ, तलाठी पेरेपत्रक व अर्ज भरुन पीक विमा काढला जातो. परंतु यंदा पीक विमा योजनेचे प्रारुप बदलून कागदपत्रे कोणती लागणार याविषयी संभ्रमावस्था होती. शहरातील अनेक झेरॉक्स सेंटरवरून गतवर्षीच्या योजनेचे अर्ज शेतकऱ्यांना विकण्यात आले. यात तलाठी पेरेपत्रक आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेचा नवीन अर्ज आला. या सातबाराचा उतारा पेरेपत्रक, आधार कार्ड आदींचा उल्लेख आहे. शेतकरी पेरे प्रमाणपत्रासाठी तलाठ्यांकडे गेले असता तलाठ्यांनी पेरे प्रमाणपत्र देण्यास असर्थता दर्शविली. आमचा पीक पाहणीचा कालावधी महसूल अधिनियमातील खंड ४ नुसार पेरेपत्रक आॅगस्ट महिन्यात उभ्या पिकाची पाहणी केल्यानंतर दिले जाते असे सांगण्यात आले. परंतु पीक विम्यात सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वघोषणा पत्र भरुन बँकेत विमा भरावा असे सांगण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांची बँकांमध्ये गर्दी झाली आहे. त्यातच पीक विमा योजनेच्या अर्जाचा तुटवडा निर्माण झाला आहे. उमरखेडच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. पाय ठेवायलाही जागा नाही. तर अनेक शेतकऱ्यांची कागदपत्रांची जुळवाजुवळ करीत असल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)