शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

पूल बांधकामाला मुहूर्तच मिळेना

By admin | Updated: December 9, 2015 02:54 IST

गेल्या १० वर्षांपासून कुंभा-दहेगाव रस्त्यावरील बेंबळा कालवा ओलांडणी पुलाचे बांधकामाचे भिजत पडले आहे.

१० वर्षे लोटली : सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता अद्याप कायममारेगाव : गेल्या १० वर्षांपासून कुंभा-दहेगाव रस्त्यावरील बेंबळा कालवा ओलांडणी पुलाचे बांधकामाचे भिजत पडले आहे. मागीलवर्षी या पुलाचे बांधकाम मंजूर होऊन एजन्सी निश्चित झाली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाच्या बांधकामासाठी अद्याप मुहूर्तच मिळाला नाही.गेल्या १० वर्षांपासून कुंभा-दहेगाव रस्त्यावरील बेंबळा कालवा ओलांडणी पुलाचे बांधकाम रखडले आहे. नियोजित बांधकामासाठी तयार केलेल्या वळण रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. या रस्त्याने ये-जा करणारे व वाहन चालक कमालीचे त्रस्त होतात. याबाबत ‘लोकमत’मधून सदर पूल ‘बांधाल तेव्हा बांधा’, पण वळण रस्त्यावरील खड्डे बुजवा’, असे वृत्त छायाचित्रासह प्र्रकाशित करण्यात आले होते. बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत या पावसाळ्याच्या प्रारंभी जेसीबी आणि टिप्पर पाठवून रस्त्यावर पडलेला खड्डा कसातरी बुजविला. परिणामी रस्त्यावर साचलेले पाणी कालव्यात काढून देण्यात आले. मात्र सदर जेसीबी आणि टिप्पर अद्याप परत का नेले नाही, असा प्रश्न आहे. ती वाहने अद्याप त्या जागी बेवारस का उभी आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही महागडी वाहने कोणाची व याठिकाणी बेवारस का सोडली, असा प्रश्न चर्चेला जात आहे. या वाहनांमुळे अपघात घडण्याचीही शक््यता बळावली आहे. गेल्या १० वर्षांपूर्वीच या पुलाचे बांधकाम मंजूर झाले होते. तथापि सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या संबंधित अभियंत्याच्या दुर्लक्षितपणाने बांधकाम करण्यात आले नाही. नंतर साहित्याच्या किमती वाढल्याने बांधकाम अवाक्याबाहेर गेले. सुज्ञ अभियंत्यांनी पुलाचे बांधकाम न घेता वळण रस्ता घेऊन याच कालव्यावर बांधालेल्या पुलावरून वाहतूक होऊ शकते, असा पवित्रा घेतला. मात्र नागरिकांनी तो हाणून पाडला. यानंतर त्याच जागी ‘फुट ब्रीज’ची कल्पना समोर आली. त्यावेळी संबंधित अभियंताचा शहाणपणा पुन्हा लक्षात आला. आता विलंबाने का होईना एक वर्षापूर्वी या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामास मंजुरी मिळाली. ‘ई-टेंडरींग’ झाले. कंत्राटदार निश्चित झाल. मात्र पुलाच्या बांधकामाचे घोडे कुठे अडले, हेच कळायला मार्ग नाही. आता पुलाच्या बांधकमाची नियोजित जागा बदलविल्याने धोकादायक वळण रस्ता तयार होणार आहे. नागरिकांनी पुनश्च बांधकामास विरोध दर्शविला असून नियोजित जागेवरच नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)पुलाच्या किमतीत दुप्पट वाढ१० वर्षांपूर्वी या पुलाला मंजुरी मिळाली होती. मात्र अद्याप पुलाचे बांधकाम झाले नाही. गेल्या १० वर्षात बांधकाम साहित्याचे दर जवळपास दुप्पट झाले आहे. त्यामुळे पुलाच्या बांधणीचा खर्च दुप्पटीने वाढणार आहे. तरीही बांधकाम विभाग पुलाच्या बांधकामास सतत चालढकल करीत असल्याचे दिसून येते.