शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशालाही ‘तत्त्वत:’चे ग्रहण

By admin | Updated: June 23, 2017 01:46 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना निकषासह, तत्त्वत: अशा शब्दांची खेळी करणाऱ्या सरकारने आता ग्रामीण भागातील

शेतकरी पुत्रांची परवड : दीड लाख विद्यार्थ्यांना सहा कोटींची प्रतीक्षाअविनाश साबापुरे । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना निकषासह, तत्त्वत: अशा शब्दांची खेळी करणाऱ्या सरकारने आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी देतानाही केवळ तत्त्वत: मंजुरी देऊन निधी मात्र दिलेला नाही. अवघ्या ५ दिवसांनी शाळा सुरू होणार आहेत. अशावेळी जिल्हास्तरावर निधीच न आल्याने दीड लाख विद्यार्थ्यांच्या पालकांसह शिक्षण विभागातही संभ्रमाचे वातावरण आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत मिळणाऱ्या शालेय गणवेशाऐवजी यंदा विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यवतमाळ जिल्ह्यात तब्बल १ लाख ५९ हजार ५११ विद्यार्थी मोफत गणवेशाचे लाभार्थी आहेत. यात यंदा वाढ गृहित धरून शिक्षण विभागाने गणवेशाकरिता वाढीव बजेट महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे (एमपीएसपी) प्रस्तावित केले होते. २०१७-१८ सत्राकरिता १ लाख ९६ हजार ५६६ विद्यार्थ्यांकरिता ७ कोटी ८७ लाख ६ हजार रुपयांचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आला. परंतु, एमपीएसपीने केवळ १ लाख ५९ हजार ५११ विद्यार्थ्यांसाठी ६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, दीड महिन्यांपूर्वी निधीला केंद्र शासनाच्या स्तरावरून तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. परंतु, राज्य शासनाच्या स्तरावरून आवश्यक असलेली अंतिम मंजुरी अद्यापही मिळालेली नाही. सध्या ही तत्त्वत: मंजुरीच ग्राह्य मानून जिल्ह्यातील सर्व शाळांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तत्त्वत: मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांच्या शाळानिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्या-त्या शाळेला यादी पाठवून पालकांच्या बैठका घेण्यास मुख्याध्यापकांना सांगण्यात आले आहे. पालकांनी आधी स्वत:च्या पैशांतून विद्यार्थ्यांना दोन गणवेश घेऊन द्यावे, त्याच्या पावत्या मुख्याध्यापकांकडे जमा कराव्या, त्या पाहूनच मग मुख्याध्यापक संबंधित विद्यार्थ्याच्या खात्यात दोन गणवेशाचे ४०० रुपये जमा करतील, ही उलटी प्रक्रिया पालकांना बैठकांमधून समजावून सांगितली जात आहे. जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी किंवा शेतमजुरांचे पाल्य आहेत. हे घटक सध्या कर्जमाफीकडे आस लावून बसले आहेत. बि-बियाण्यांसाठी उसनवारी करणाऱ्या पालकांना आता पोरांच्या गणवेशासाठीही स्वत:च खर्च करण्याची वेळ आली आहे.