१८ जून : ज्योत्स्ना दर्डा जयंतीनिमित्त आयोजन यवतमाळ : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन शनिवार १८ जून रोजी दुपारी ४ वाजता येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आले आहे. केवळ सखी मंच सदस्यांसाठी असलेली ही स्पर्धा नि:शुल्क आहे. १०० गुणांचा पेपर राहणार असून त्यासाठी एक तासाचा वेळ दिला जाईल. प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी उत्तरे राहणार आहे. त्यातील एका योग्य पर्यायावर टीक मार्क करावयाची आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच दोन प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जाणार आहे. स्पर्धा स्थळी सखी मंचचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. प्रकल्प अधिकारी म्हणून कविता तातेड, छाया राठोड, सुनिता भोयर, अलका राऊत काम पाहत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)
सखी मंचच्यावतीने सामान्य ज्ञान स्पर्धा
By admin | Updated: June 13, 2016 01:00 IST