शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गौतम बुद्धांचा अस्थी कलश दर्शनासाठी यवतमाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:08 IST

बुद्ध पौर्णिमेनिमित्त यवतमाळात तथागत गौतम बुध्दांच्या अस्थी असलेला कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. स्थानिक बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्ध पौर्र्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देबुद्धवंदना आणि खीरदान : बाल श्रामणेरांच्या रॅलीने लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बुद्ध पौर्णिमेनिमित्त यवतमाळात तथागत गौतम बुध्दांच्या अस्थी असलेला कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. स्थानिक बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्ध पौर्र्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता बुद्धवंदना घेण्यात आली, पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बाल श्रामणेर, भंते आणि समाजबांधव उपस्थित होते.हिवरी येथील जेतवन पर्यटन स्थळातर्फे बालश्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या शिबिराचा समारोप सोमवारी झाला. यावेळी जेतवनचे पदाधिकारी उपस्थित होते.बाल श्रामणेर भंतेंची रॅली आयोजित करण्यात आली होती. स्थानिक लाठीवाला पेट्रोलपंपापासून निघालेली रॅली महात्मा फुुले चौक, दत्त चौक मार्गे बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ विसर्जीत झाली. यावेळी थायलंडवरून आणलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी खीरवितरण करण्यात आले. यावेळी रवी श्रीरामे, के.एस. नाईक, बंडूपंत पोहेकर, डॉ.सुभाष डोंगरे, मधुकर भैसारे, रणधीर खोब्रागडे, जेतवनचे अध्यक्ष अनिल बनसोड, शिबिराचे आयोजक रमेश बनसोड, गौतम बनसोड आदी उपस्थित होते.