शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत गुरूजनांच्या कार्याचा गौरव

By admin | Updated: September 7, 2016 01:32 IST

सतत नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३१ गुरूंचा मंगळवारी जिल्हा परिषदेने शाल,....

यवतमाळ : सतत नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३१ गुरूंचा मंगळवारी जिल्हा परिषदेने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यात १७ जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार व १४ शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय प्रवेशोत्सव, जाहिरात बनवा पटसंख्या वाढवा स्पर्धेतील यशस्वी शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तिपत्र देऊन जिल्हा परिषदेच्या सभागृहात गौरविण्यात आले. यात गजानन तुरारे, रामभाऊ बोलवार, चंद्रशेखर तिखे, कैलास गव्हाणकर, महादेव निमकर, गोविंद घाडगे, विजय जाचक, विनोद डंभारे, आमिन चव्हाण, विजय कडू, गणेश अर्जापुरे, देविदास बोंडे, गणेश निकोले, वंदना केने, फरीद अहमद खान रशीद खान, प्रशांत गवळी, तर माध्यमिकच्या विणा सुनील शहाडे यांचा गौरव करण्यात आला.याशिवाय किसन भुरके, प्रसाद देशपांडे, विजय विश्वकर्मा, नंदू चव्हाण, जगदीश खाडे, संजय गडपायले, गजानन भगत, घनश्याम पाटील, शंकर इंगळे, कमलकिशोर कदम, पुष्पा गेडाम, सुरेश कुंभलकर, गणपत गाऊत्रे आणि मोरेश्वर पुंडशास्त्री यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.या सर्वांना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, समाज कल्याण सभापती लता खांदवे, महिला व बालकल्याण सभापती विमल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर आदींच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला विविध विभाग प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)गुणवंत विद्यार्थी, विजेत्यांचा सन्मानयाच कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळांतील दहावी आणि बारावीतील २७ गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच तंबाखूमुक्ती निबंध लेखन स्पर्धेतील विजेते वासुदेव सोनिराम बोडखे यांना प्रथम, अर्चना वासेकर यांना दिव्तीय, तर सीमा दामोधर पोटदुखे व अजाब खडसे यांना विभागून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय प्रतिमा खडतकर, सरदेश दुर्गे, गणेश चव्हाण यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. यासोबतच पटसंख्या वाढविण्यासाठी ‘जाहिरात बनवा’ स्पर्धेतील विजेते व शाळेच्या पहिल्या दिवशी यशस्वी प्रवेशोत्सव राबविणाऱ्या ४४ शाळांचाही सन्मान करण्यात आला.