शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

परजना येथे गॅस्ट्रोचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:25 IST

गॅस्ट्रोची लागण झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना परजना येथे शुक्रवारी घडली.

‘पीएचसी’चा हलगर्जीपणा : थातुरमातूर उपचार करून घरी पाठविलेशिरसगाव(पांढरी) : गॅस्ट्रोची लागण झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना परजना येथे शुक्रवारी घडली. गजानन चव्हाण (४०) असे मृताचे नाव आहे. प्रकृती गंभीर झाल्याने यवतमाळ येथे हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.गजानन चव्हाण यांना गुरुवारपासूनच उलट्या आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. उपचारासाठी शिरसगाव(पांढरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सलाईन आणि इतर औषधोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र गॅस्ट्रोचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा या आरोग्य केंद्रात आणण्यात आले. डॉक्टरांनी यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला दिला. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गजानन चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गजाननच्या मृत्यूस शिरसगाव पांढरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी यावेळी केला. गुरुवारी थातुरमातूर उपचार करून गजाननला घरी पाठविण्यात आले. रुग्णालयात दाखल करून घेतले असते तर योग्य उपचार झाले असते. या सर्व बाबी टाळल्याने गजानन चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. उमरठा-परजनाच्या सरपंच प्रभाताई खोडे यांनीही गजाननच्या मृत्यूस आरोग्य अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. सदर प्रकरणी तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेतजिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांनी शुक्रवारी परजना गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गजानन चव्हाण यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून घ्यायला पाहिजे होते, असे त्यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी अमोल काळे यांच्यावर कारवाईचे संकेत त्यांनी दिले. यावेळी साथरोग अधिकारी गोषटवार, नेरचे गटविकास अधिकारी राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी दुर्गे आदी उपस्थित होते.