शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊ वस्तूपासून बनविली पेट्रोलवर चालणारी सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 21:48 IST

अडगळीत पडलेली सायकल आणि लुनाचे स्पेअरपार्ट जोडजाड करून पेट्रोलवर चालणारी सायकल बनविण्याची किमया कृष्णापूरच्या (ता.पांढरकवडा) शेतकरी पुत्राने साधली आहे.

ठळक मुद्देजुगाड टेक्नॉलॉजी : कृष्णापूरच्या सुरजने साधली किमया

शेषराव राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहदा : अडगळीत पडलेली सायकल आणि लुनाचे स्पेअरपार्ट जोडजाड करून पेट्रोलवर चालणारी सायकल बनविण्याची किमया कृष्णापूरच्या (ता.पांढरकवडा) शेतकरी पुत्राने साधली आहे. सुरज दिलीप वानखडे याने ही सायकल तयार केली असून, प्रती लिटर ५० ते ५५ किलोमीटर अ‍ॅव्हरेज देत असल्याचा दावा त्याने केला आहे.सुरजला दहावीनंतर मोटर मेकॅनिक व्हायचे होते. परंतु या प्रयत्नात तो यशस्वी झाला नाही. १२ वी पर्यंत शिक्षण झालेले. पण त्याच्यातील यांत्रिक गुण स्वस्थ बसू देत नव्हता. घराच्या आवारात पडून असलेली निकामी सायकल आणि लुनाही त्याला सतत खुणावत होती. जुगाड टेक्नॉलाजीतून सुरजने चक्क पेट्रोलवर धावणारी सायकल उभी केली.लुनाचे इंजीन व चाक आणि सायकलची फे्रम यासाठी वापरण्यात आली. थोड्याफार तांत्रिक बाजूंची जुळवाजुळव करून पेट्रोलवर चालणारी सायकल अवघ्या काही महिन्यात उभी केली. यासाठी केवळ एक हजार रुपये खर्च आला. या सायकलचे वजन ३० किलो आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये ५० ते ५५ किलोमीटर धावते. कुठलेही तांत्रिक शिक्षण न घेता तयार केलेली सायकल पाहून सुरजचे कौतुक केले जात आहे.‘मेक इन इंडिया’च्या अनुषंगाने सुरजने या सायकलला ‘नमो’ नाव दिले आहे. कमी पैशात चारचाकी बनविण्याचे सुरजचे स्वप्न आहे. अशा गुणवंताला आणखी तांत्रिक ज्ञान मिळाल्यास त्याच्या स्वप्नाला आकार येण्यास वेळ लागणार नाही, एवढे मात्र निश्चित. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान