शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख ‘बीपीएल’ कुटुंबांना गॅस सिलिंडर

By admin | Updated: August 20, 2016 00:13 IST

वृक्षतोडीवर मात करून पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

केंद्राचे अनुदान : महिलांच्या नावे मालकी, लाभार्थी हिस्स्यासाठी मदत यवतमाळ : वृक्षतोडीवर मात करून पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेच्या माध्यमातून दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना गॅस सिलिंडर वितरित करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर मिळणार आहे. लाभार्थी वाटा जे ग्राहक उचलू शकणार नाही, त्यांची जबाबदारी गॅस कंपनी उचलणार आहे. यामुळे गोरगरीब कुटुंबांच्या झोपडीतही गॅस सिलिंडर पाहायला मिळणार आहे. केंद्र शासनाने गरिबांच्या घरात गॅस पोहोचविण्यासाठी पंतप्रधान उज्वल योजना हाती घेतली आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला अनुदानात गॅस सिलिंडर मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्राने जाहीर केली आहे. या यादीत नाव असणाऱ्या लाभार्थ्यांनाच गॅस सिलिंडरचे कनेक्शन दिले जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. गॅस खरेदीसाठी केंद्राने काही अटी ठेवल्या आहेत. ५४०० रूपयांचे गॅस सिलिंडर बीपीएल धारकांना ५० टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. याकरिता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला ३४०० रूपयात गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. यामध्ये पात्र ग्राहकाला १७०० रूपये भरावे लागणार आहेत. तर १७०० रूपयांचा वाटा केंद्र शासन भरणार आहे. जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब लाभार्थी वाटा भरण्यासाठी अक्षम आहे अशा कुटुंबाचा वाटा गॅस कंपनी भरणार आहे. हा वाटा कर्जाच्या रूपात असणार आहे. ग्राहकांनी सिलिंडरची खरेदी केल्यानंतर सबसिडीची रक्कम कंपनी आपल्याकडे वळती करणार आहे. या माध्यमातून कर्जाची परतफेड केली जाणार आहे. यामुळे पैसे नसणाऱ्या पात्र ग्राहकांना गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. या गॅस सिलिंडरची मालकी कुटुंबातील महिलांच्या नावे असणार आहे. (शहर वार्ताहर) असे लागणार कागदपत्र प्रधानमंत्री उज्वल योजनेसाठी २०१३ ची दारिद्रय रेषेची यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. या यादीतील पात्र लाभार्थ्यांची नावे कंपनीने गॅस वितरकांकडे पाठविली आहेत. या ग्राहकांना विनाअट गॅस सिलिंडर द्यायची आहेत. यासाठी दारिद्र्य रेषेचे कार्ड, कार्डातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, बँक खात्याचे पासबुक, दोन पासपोर्ट फोटो, मतदान कार्ड अथवा वीजबिल, ड्रायव्हिंग लायसन असावे लागणार आहे. यासाठी विनाशुल्क अर्ज आणि कागदपत्र गॅस कंपनी भरून घेणार आहे. गाव सोडल्याने वाढल्या अडचणी प्रत्येक गॅस एजंसी मालकांना यादीनुसार गॅस सिलिंडरचे वितरण करण्याच्या सूचना आहेत. ही यादी २०१३ ची आहे. यामुळे यादीतील अनेक लोक गाव सोडून गेले. तर अनेक जन बाहेरगावावरून शहरात आले. यामुळे पात्र लाभार्थी असले तरी त्यांना यादीत नाव नसल्याने दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला गॅस सिलिंडर मिळणार नाही. यातून अडचणी वाढल्या आहेत.