शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणाने कृषी उत्पादन गारद

By admin | Updated: January 8, 2016 03:10 IST

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती.

कापसावर तेल्या रोग : एक महिन्यापूर्वीच तुरीचा हंगाम संपलारूपेश उत्तरवार यवतमाळ दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती. भाव तर मिळाला नाहीच, पण रोगांच्या आक्रमणाने बहुतांश शेतकऱ्यांची उभी पऱ्हाटी वाळून गेली. सातत्याने बदलणाऱ्या वातावरणाचा हा दुष्परिणाम असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असले तरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना अजूनही दृष्टिपथात नाहीत. ही कथा केवळ कापसाचीच नाही, तर खरिपातील सोयाबीन आणि तुरीलाही फटका बसला आहे. अन् आता रब्बी पिकांनाही बदलत्या वातावरणाची झळ पोहोचली आहे.ग्लोबल वार्मिंगने ऋतूचक्रच प्रभावित झाले आहे. पावसाळा एक महिना पुढे सरकला आहे. थंडीच्या महिन्यात थंडी पडेनाशी झाली. याचा परिणाम थेट कृषी क्षेत्रावर पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे होते. त्या खालोखाल सोयाबीन आणि तूर पीक घेण्यात आले. खरिप हंगाम संपण्यात जमा झाला आहे. कोरडवाहू क्षेत्रात उलंगवाडीची स्थिती आहे. ओलिताची अवस्था अशीच बिकट होत आहे.ढगाळी वातावरण आणि धुवारीमुळे कापसाचे पीक प्रभावित झाले आहे. कपाशीवर तेल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे पाने करपायला सुरवात झाली आहे. पान तेलकट आणि काळे पडत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हादरले आहे. कोरडवाहू क्षेत्रात शेतकऱ्यांना एकरी काही किलो आणि क्विंटलचा अ‍ॅव्हरेज आला. तर ओलितात दोन अथवा तीन क्विंटलचा सरासरी वेचा निघाला आहे. सोयाबीन आणि कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीला मूठभर शेंगा आणि हिरवा पालाच राहीला. बदलत्या वातावरणाने तुरीवर किडीचे आक्रमण झाले. धुवारीने गळ झाली. सात बारांपैकी काही बार फळलेच नाही. परिणामी फेब्रुवारी महिन्यात निघणारी तूर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांचा दारात आली. परंतु, त्यातून २-४ कट्टे तूर निघणेही अवघड झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून थ्रेशर मशिन माघारी फिरल्या. तुरीला जरी चांगले दर असले, तरी शेतकऱ्यांच्या शेतात तुरीचे उत्पादन नसल्यातच जमा आहे. गव्हाची आणि हरभऱ्याची स्थितीही भयावह आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी शेतात गहू आणि हरभरा पेरला. मात्र थंडीचा पत्ताच नाही. या दोनही पिकांना थंडी आवश्यक आहे. थंडीअभावी गव्हाच्या उंबयांचा आकार निम्माच झाला आहे. थंडीअभावी हरभऱ्यावरही किडीचे आक्रमण झाले आहे. यामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.