शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभरात कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना होत्या. त्या दृष्टीने शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. सार्वजनिक गणेश मंडळाच्या तुलनेत घरगुती गणेशमूर्तीची स्थापना करणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षी सर्वाधिक पहायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी सकाळपासूनच यवतमाळ शहरात गणेशभक्तांची गर्दी पहायला मिळत होती. कोरोनामुळे नियमांचे पालन करीत मंडळांनी अतिशय साध्या पद्धतीने गणरायाची स्थापना केली. बॅन्ड आणि ढोलताशा पथक नसले तरी गणरायाचा जयघोष करीत भक्तांनी गणेशमूर्तीची विधिवत स्थापना केली. स्थानिक पोस्टल ग्राउंड मैदानावर मूर्तिकारांची आणि खरेदीदारांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळाली.जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभरात कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना होत्या. त्या दृष्टीने शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. सार्वजनिक गणेश मंडळाच्या तुलनेत घरगुती गणेशमूर्तीची स्थापना करणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षी सर्वाधिक पहायला मिळाली. त्या दृष्टीने मूर्तिकारांनीही मोठ्या प्रमाणात छोट्या मूर्ती बनविल्या होत्या. गणरायाच्या मूर्तीच्या किमती यावर्षी वाढ झाल्याचे चित्र होते. मूर्ती स्थापनेसोबतच सजावट साहित्यही महागल्याचे चित्र स्थानिक बाजारात होते. यामुळे भाविकही संकटात सापडले होते. लालमातीची मूर्ती खरेदी करण्यावर ग्राहकांचा सर्वाधिक कल राहिला. याशिवाय शहरातील नामवंत मूर्तीकारांकडे सकाळपासूनच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गणरायाचे आगमन होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. मात्र मूर्तीची उंची मर्यादित असल्याने नियमानुसार मूर्तीची निर्मिती करण्यात आली होती. मोजकेच कार्यकर्ते गणरायाची मूर्ती नेण्यासाठी मूर्तीकारांकडे पोहोचल्याचे चित्र आज शहरातील विविध भागांत पहायला मिळाले. गणरायाच्या स्वागतासाठी कलावंतांनी मुख्य रस्त्यावर रांगोळी काढून लक्ष वेधले होते. 

शासकीय सुटीने मंडळांपुढे परवानगीचा पेच - गणरायाची मूर्ती स्थापन करताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. परवानगीसाठी आयुक्त कार्यालयाने विविध नियम घातले आहेत. त्यामुळे मूर्तीची स्थापना करताना मंडळांपुढे पेच निर्माण झाला होता. यामुळे गुरुवारपर्यंत केवळ १५८ मंडळांचे अर्ज आले. त्यापैकी ५३ मंडळांना परवानगी मिळाली. आता इतर मंडळांनाही नोंदणी करायची आहे. मात्र शासकीय सुटी असल्याने अनेक मंडळे अडचणीत आली आहे.

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवcorona virusकोरोना वायरस बातम्या