शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ची गांधीगिरी

By admin | Updated: April 22, 2017 01:43 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आसूड यात्रा निघाली.

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आसूड यात्रा निघाली. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी येथे शुक्रवारी बसस्थानक चौकात ‘आमचे रक्त घ्या, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’, असे म्हणत रक्तदान केले. येथील बसस्थानक चौकात प्रहारच्या नेतृत्वात गांधीगिरीला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून शेतकऱ्यांचे रक्त ओढू नका, आमचे रक्त घ्या, अशा घोषणा करीत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नंतर तेथेच काही कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. कार्यकर्त्यांनी प्रथम पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर रक्तदान करण्याची परवानगी पोलिसांना मागितली. त्यांची मागणी पोलिसांनी धुडकावली. तसेच शासकीय रूग्णालयालाही त्यांचे रक्त घेण्यास नाकारले. यामुळे आंदोलनकर्ते संतापले. त्यांचे उग्ररूप बघून अखेर वैद्यकीय महाविद्यालयाने ४ वाजता रक्तदानाचा आग्रह मान्य केला. त्यानंतर रवि राऊत, सुभाष कुळसंगे, प्रज्ञा कुळसंगे, कार्तिक चौधरी, अमित गावंडे, हंसराज सोमवंशी, आशिष तुपटकर, राज महाजन, नीतेश ठाकरे, दर्शन भारती, निरज काळे, दुर्गेश नवलकर, आकाश चिंचोळकर, आकाश सोमवसे आदींनी रक्तदान केले. (शहर वार्ताहर)