शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक पुसदचा गणबादेव गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:34 IST

पूस नदीतीरावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ मध्ये शेतकरीपुत्र धारू पाटील यांनी गणबादेव गणपतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर सखाराम पाटील, दत्तराम पाटील, शेषराव पाटील व आता शरद पाटील यांनी ही परंपरा कायम राखत गणबादेवाची स्थापना सुरू ठेवली. गणबादेवासाठी खास रथाची निर्मिती केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील मुस्लीम कारागिर सरफराज शेख यांनी तयार केलेल्या रथातून मानाच्या गणबादेव गणपतीची पारंपरिक वाद्याच्या गजरात स्थापना केली जाते.

ठळक मुद्दे११५ वर्षांची परंपरा : राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून येथील गणबादेव गणपतीची ख्याती आहे. या गणपतीला ११५ वर्षांची परंपरा लाभली आहे. सर्वधर्म समभाव जोपासत या मानाच्या गणपतीची स्थापना केली जाते.पूस नदीतीरावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ मध्ये शेतकरीपुत्र धारू पाटील यांनी गणबादेव गणपतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर सखाराम पाटील, दत्तराम पाटील, शेषराव पाटील व आता शरद पाटील यांनी ही परंपरा कायम राखत गणबादेवाची स्थापना सुरू ठेवली. गणबादेवासाठी खास रथाची निर्मिती केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील मुस्लीम कारागिर सरफराज शेख यांनी तयार केलेल्या रथातून मानाच्या गणबादेव गणपतीची पारंपरिक वाद्याच्या गजरात स्थापना केली जाते.गेल्या पाच पिढ्यांपासून येथील भोई बांधव गणबादेवाचा रथ ओढतात. पुसदचे ग्रामदैवत म्हणून गणबादेवाची ओळख निर्माण झाली आहे. सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या गणबादेव गणेशोत्सवात विविध सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. मिरवणुकीत सर्वधर्मीय सहभागी होतात. यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो.या गणपतीला राज्य शासनाचा उत्कृष्ट गणपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. सध्या गणबादेव गणेश मंडळाची जबाबदारी शरद पाटील, सुधाकर वासीमकर, चंद्रकांत सेता, अनिल पाटील, सतीश पंडितकर, सुदेश सांबरे, सुरेश चौधरी, संजय पाटील, ऋषीकेश पंडितकर, दीपक देशमुख, अ‍ॅड.विनोद पाटील सांभाळत आहे.विसर्जन मिरवणुकीत अग्रभागाचा मानदरवर्षी विसर्जन मिरवणुकीत गणबादेव गणपतीला अग्रभागी मानाचे स्थान दिले जाते. त्यानंतर इतर सर्व गणेश मंडळांच्या मूर्त्या असतात. गणबादेव गणपती मंडळाने तब्बल १४ किलो चांदीचे रत्नजडीत सिंहासन तयार केले आहे. याच सिंहासनावर गणबादेवाची स्थापना होते. त्याला ११ ग्रॅम सोन्याचे दंत बसविले जाते. गणबादेवाच्या दर्शनासाठी शहरासह तालुक्यातील भक्त गर्दी करतात.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019