शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचा प्रवास केंद्रापर्यंत, पूल मात्र भूमिपूजनावरच

By admin | Updated: October 16, 2015 02:13 IST

राज्याचे बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी भूमिपूजन केलेल्या पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नाही.

हरिओम बघेल आर्णी राज्याचे बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी भूमिपूजन केलेल्या पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नाही. गडकरी केंद्रात भूपृष्ठ वाहतूक मंत्री झाले. मात्र अडाण नदीवर आजही भूमिपूजनाचा फलकच कायम आहे. १६ वर्षानंतरही या पुलाचे बांधकाम सुरू झाले नसल्याने गावकऱ्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळचे अंतर कमी करणारा हा पूला केव्हा होणार असा प्रश्न आर्णी तालुक्यातील म्हसोला परिसरातील नागरिकांना पडला आहे.आर्णी तालुक्यातील म्हसोला आणि रूई दरम्यान अडाण नदी वाहते. या नदीवर पूल झाल्यास यवतमाळचे अंतर २० किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांचीही सोय होणार आहे. त्यामुळेच राज्यात युतीची सत्ता असताना पूल बांधण्याचा प्रस्ताव आला. पुलाचे भूमिपूजन करण्याचे ठरले. ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन करण्याचे निश्चित झाले. भूमिपूजनासाठी फलक लावण्यात आला. ना.गडकरी गावात येणार म्हणून जवळा गावाजवळून म्हसोलापर्यंत ताबडतोब रस्ताही करण्यात आला. रात्रीच्या वेळी येऊन ना. गडकरी यांनी भूमिपूजन केले. आता अडाण नदीवर पूल निश्चितच होणार अशी भाबडी आशा म्हसोला, पांगरी, पहूर, शकलगाव, अंजी, भांबोरा या गावातील नागरिकांना लागली होती. शेकडो गावकरी त्यावेळी भूमिपूजनाला उपस्थित होते. मात्र भूमिपूजनानंतर बांधकामाला सुरुवातच झाली नाही. युतीच्या काळात बांधकामासाठी निधी आला नाही. त्यामुळे म्हसोलाचे तत्कालीन उपसरपंच भास्कर राऊत यांनी लोकशाही दिनात पाठपुरावा केला. तत्कालीन अधीक्षक अभियंत्याने राऊत यांना एक पत्र दिले. त्या पत्रात सदर काम अर्थसंकल्पात समाविष्ठ असून निधीअभावी काम प्रलंबित आहे. निधी उपलब्ध होताच काम हाती घेण्यात येईल, असे म्हटले.आता याही पत्राला १५ वर्ष होऊन गेले. मात्र पुलाच्या बांधकामाला प्रारंभ झाला नाही. ना.नितीन गडकरी राज्यातून केंद्रात गेले. केंद्रात भूपृष्ठ वाहतूक मंत्री झाले. परंतु त्यांनी भूमिपूजन केलेला पूल आजही बांधकामाच्या प्रतीक्षेतच आहे. आता पुन्हा राज्यात युतीची सत्ता आली आहे. त्यामुळे आता तरी हा पूल व्हावा, अशी अपेक्षा आहे.