शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

भविष्यात डॉक्टरांची जबाबदारी वाढणार

By admin | Updated: June 2, 2015 00:15 IST

मेडिकलच्या अ‍ॅडमिशन महाग झाल्या, त्यासोबतच डॉक्टरी पेशाही दिवसेंदिवस महाग होत आहे.

विजय दर्डा : दृष्टी आय केअरमधील अत्याधुनिक यंत्रांचे उद्घाटनयवतमाळ : मेडिकलच्या अ‍ॅडमिशन महाग झाल्या, त्यासोबतच डॉक्टरी पेशाही दिवसेंदिवस महाग होत आहे. डॉक्टर व रुग्ण यांचे नाते विश्वासाचे आहे. समाजात डॉक्टरांचे योगदानही मोठे आहे. त्यामुळे डॉक्टरांनी नैतिकतेने प्रॅक्टीस करावी, कारण भविष्यात त्यांची जबाबदारी वाढणार आहे, असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले आहे. धामणगाव रोड स्थित डॉ. सुबोध पुरोहित यांच्या दृष्टी आय केअरमधील अत्याधुनिक उपकरणांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ.टी.सी. राठोड, जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, गोपाल पुरोहित उपस्थित होते. विजय दर्डा म्हणाले, मानवी जीवनात संस्कार महत्वाचे आहे. या संस्कारामुळेच वैद्यकीय क्षेत्रातील कमिशन पॅटर्न बंद होईल, डॉक्टरांमध्ये नैतिकतेच्या दृष्टीने बदल होईल, असा विश्वास वाटतो. या वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांनी स्वस्तात दर्जेदार सेवा देणे अपेक्षित आहे. पूर्वी डॉक्टरांना नाडी पाहून निदान करावे लागत होते. मात्र आता तंत्रज्ञानामुळे शरीराच्या प्रत्येक भागाचे सूक्ष्म निरीक्षण करणे शक्य झाले आहे. त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. विदेशात शिक्षण घेऊनही डॉ. सुबोध पुरोहित व शालिनी पुरोहित यांनी वैद्यकीय व्यवसायासाठी यवतमाळची निवड केल्याने विजय दर्डा यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. दृष्टी आय केअरमध्ये अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध झाल्याने आता डोळ्यांच्या विविध आजारांचे वेळीच निदान व उपचार होणे शक्य होणार आहे. त्यासाठी आता रुग्णांना दुसऱ्या प्रांतात अथवा जिल्ह्यात जाण्याची गरज राहणार नसल्याचे दर्डा यांनी सांगितले. या प्रसंगी डॉ.टी.सी. राठोड यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ. सुबोध पुरोहित म्हणाले, दृष्टी आय केअरने सुरुवातीपासून अत्याधुनिक तंत्रज्ञान व औषधींवर भर दिला आहे. मधुमेह ही गंभीर समस्या असून त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो. सन २०२५ मध्ये देशातील मधुमेही रुग्णांची संख्या पाच कोटी ७० लाख एवढी होणार आहे. अत्याधुनिक मशीनमुळे डोळ्यांच्या प्रत्येक आजाराचे नेमके निदान शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विजय दर्डा यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, अ‍ॅड. आर.के. मनक्षे, डॉ. सुनील अग्रवाल, डॉ. सी.बी. अग्रवाल, डॉ. दीपक सव्वालाखे, डॉ. ललित निमोदिया, संतोष भूत, डॉ. विजय अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)