शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटाराच्या कामाविषयी रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:07 IST

येथील वाघापूर परिसराच्या संभाजीनगर भागात ड्रेनेजचे काम केले जात आहे. या कामाची पद्धत योग्य नसल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. गुणनियंत्रण विभागाकडून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : वाघापूर परिसरातील नागरिक संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वाघापूर परिसराच्या संभाजीनगर भागात ड्रेनेजचे काम केले जात आहे. या कामाची पद्धत योग्य नसल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. गुणनियंत्रण विभागाकडून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.वैशालीनगर, माधवनगर, संभाजीनगर, रंभाजीनगर, रेणूकानगरी आदी भागात ड्रेनेजसाठी गुळगुळीत असलेले रस्ते खोदण्यात आले. एवढे करूनही होत असलेले ड्रेनेजचे काम भविष्यात अनेक समस्यांना जन्म देणारे ठरतील, असे आजचे चित्र आहे. ड्रेनेज बांधण्यापूर्वी काँक्रिट (बेड) टाकले गेले नाही. थेट विटा, गिट्टी आणि सिमेंटद्वारे टाके बांधण्यात आले. पुढील काळात याठिकाणी पाणी झिरपण्याची शक्यता आहे. आजूबाजूला नागरिकांचे जलस्रोत आहे. या जलस्रोताला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.बांधकामाचा दर्जाही निकृष्ट आहे. क्युरिन नाममात्र केले जात आहे. त्यामुळे या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय खोदलेल्या रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोनही प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रकाश माळवी, जगन्नाथ शिरसाट, नीळकंठ पानजवार, नंदकिशोर जाधव, विठ्ठल विलायतकर, पंढरीनाथ काकरवार, नागेश दुधकोहळे, वसंतराव ढोले, विलासराव गोर्लेवार, महादेवराव हर्षे, बळीराम गोलाईत, रमेश शेलोटकर, सुरेश पांडे, आनंद काळबांडे, शंकरराव धुर्वे, मंगेश वड्डेवार, सुधाकर सामृतवार, भाऊराव डांगरे, पी.आर. पांडे, अभिजित बोरकर, एल.बी. गारसेलवार, एस.बी. केशववार आदी नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षºया आहेत. प्रसंगी त्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे.वाहतुकीची कोंडीभूमिगत गटार योजनेच्या कामासाठी झालेल्या खोदकामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. खोदकाम सात-सात दिवसपर्यंत बुजविले जात नाही. या परिस्थितीत नागरिकांना आपल्या घरापर्यंत पोहोचणेही कठीण होऊन बसते. या कामात तत्परता असावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.