लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : इंधन दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्यावतीने आर्णी येथील बाबा कंबलपोष दर्गासमोर सोमवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला. यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पदाधिकाऱ्यांनी दुचाकीची अंत्ययात्रा काढली. तर कार्यकर्ते या आंदोलनात सायकलने सहभागी झाले होते.पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच तालुक्यातील शेतकºयांच्या विविध समस्या आहे. या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आर्णी काँग्रेसच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकीची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी साजीद बेग, अनिल आडे, जितेंद्र मोघे, अॅड. प्रदीप वानखडे, विजय मोघे, सुनील भारती, आरीज बेग, पंचायत समितीचे सभापती सुरेश जयस्वाल, बाळासाहेब शिंदे, सुरेश काळे, नितीन बुटले, अमोल मांगुळकर, बाळासाहेब गिरी, छोटू देशमुख, कादर इसानी, सुरेश मोर्लेवार, भारत राठोड, अतुल देशमुख, राजू आडे, पंडित बुटले, डॉ. रामचरण चव्हाण, निता ठाकरे, रेणुताई बोईनवार आदी सहभागी झाले होते.
इंधन दरवाढीविरोधात दुचाकीची प्रेतयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:22 IST
इंधन दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्यावतीने आर्णी येथील बाबा कंबलपोष दर्गासमोर सोमवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला. यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पदाधिकाऱ्यांनी दुचाकीची अंत्ययात्रा काढली. तर कार्यकर्ते या आंदोलनात सायकलने सहभागी झाले होते.
इंधन दरवाढीविरोधात दुचाकीची प्रेतयात्रा
ठळक मुद्देकार्यकर्ते सायकलवर : आर्णी येथे काँग्रेसचा चक्काजाम