शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

बोरीअरबमध्ये आरोग्य केंद्राची प्रेतयात्रा

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाही.

बोरीअरब : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाही. आरोग्य केंद्राला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा स्थितीत शुक्रवारी रात्री गावातील एका रुग्णाला घेऊन आरोग्य केंद्रात आले होते. मात्र येथे परिचारिकेशिवाय इतर कोणताही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी शनिवारी सकाळी आरोग्य केंद्राची साफसफाई करून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. निलेश तिवारी व धर्मेंद्र बोरकर आरोग्य केंद्रात उपचारासाठी रुग्णाला घेऊन गेले होते. त्यांना येथील गैरप्रकार आढळून आला. त्यानंतर शनिवारी सकाळी ओमप्रकाश लढ्ढा, बबलू जयस्वाल, जीवन बोरकर, निलेश तिवारी, चेतन देशमुख, वसंतराव जांभोरे, नागोराव भगत, लखन बागडे, रणजित काकडे, विनोद कावरे, जावेद पठाण, शंकर गौरकार, जहागीरखॉ पठाण आदी गावकऱ्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केले. याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड, हिवताप अधिकारी सुरेश तरोडकर यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी आरोग्य केंद्रातील अधिकारी डेहणकर, दुधे यांच्यासह कर्मचाऱ्यांची या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. केंद्राचे काम सुधारण्याचे निर्देश दिले. (वार्ताहर)