शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना आकर्षित करण्याचे फंडे

By admin | Updated: June 6, 2014 00:13 IST

खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. अतवृष्टीमुळे सोयाबीनसारखे पीक हातातून गेले आहे. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडणार असल्यामुळे कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याचे सल्ले देणे सुरू केले आहे.

जादा उत्पन्नाचे दावे : कृषी केंद्र संचालकांना विविध आमिषेयवतमाळ : खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. अतवृष्टीमुळे सोयाबीनसारखे पीक हातातून गेले आहे. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडणार असल्यामुळे कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याचे सल्ले देणे सुरू केले आहे. अशातच संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी विविध बियाणे कंपन्यांनी अभिनव फंडे शोधले आहे. जादा उत्पादनाची हमी देणारी फलके कृषी केंद्र व दर्शनीय ठिकाणी लावल्यामुळे शेतकर्‍यांचा संभ्रम वाढला आहे.यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा पडल्यामुळे कपाशीच्या लागवडीकडे शेतकर्‍यांनी मोर्चा वळविला आहे. अशातच मागील दोन महिन्यांपासून विविध कपाशी बियाण्यांच्या कंपन्यांनी आपल्या वाणाचे दावे करण्याची अभिनव शक्कल लढविली आहे. शेतकर्‍यांना आपलेच बियाणे कसे जादा उत्पन्न देणारे आहे, हे सांगण्यासाठी मोठाले फलक लावण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांना प्रत्यक्षात एकरी दहाही क्विंटल कापूस झाला नाही अशा शेतकर्‍यांच्या नावे एकरी १८ ते २0 क्विंटल उत्पन्न घेतल्याचे जाहिरातीच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे. वास्तविक पाहता जे शेतकरी एकरी १५ क्विंटलच्या वर उत्पन्न घेतात त्या शेतकर्‍यांकडे ओलिताची व्यवस्था असते. मात्र जाहिरात फलकावर ओलिताच्या व्यवस्थापनाबाबत काहीही नमूद केलेले नसते. जाहिरात फलकावरील शेतकर्‍याला उत्पादन झाले. मग आपल्याला का होणार नाही, या भावनेतून अनेक शेतकरी जाहिरातबाजीला बळी पडताना दिसत आहे.एकीकडे सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडला असताना सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी मात्र वाढली आहे. अशातच तुटवड्याच्या नावाखाली एका बॅगला तीन हजार रुपये वसूल करण्याचा फंडाही कृषी केंद्र संचालकांनी वापरणे सुरू केले आहे. सोयाबीनचा जादा अँवरेज देणारे बियाणे अमक्या कंपनीचे आहे. त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात, अशा प्रकारचे प्रलोभन शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे कपाशीच्या बियाण्याची जादा विक्री व्हावी म्हणून काही कंपन्यांनी कृषी केंद्र संचालकांना विविध ऑफर्स दिल्याची माहिती आहे. या माध्यमातून बँकॉकसारख्या देशातील दौरेही ठरविण्यात आले आहे.ज्या कृषी केंद्र संचालकांना परदेशात जावयाचे नाही त्यांना मात्र परदेश दौर्‍यासाठी लागणारी रक्कम नगदीत कापून दिल्या जात असल्याची चर्चा आहे. अतवृष्टी व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना बियाणे घेण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना कृषी केंद्र संचालक व काही कंपन्या मात्र भ्रममुलक दावे करणारे वाण शेतकर्‍यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)