शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्ग विकास महामंडळ व खादी ग्रामोद्योगला निधी

By admin | Updated: February 4, 2016 02:34 IST

केंद्र शासनाकडून सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी विशेष केंद्रीय सहाय्यांतर्गत पहिला हप्ता ३१ कोटी ६१ लाख २० हजार रुपयांचा प्राप्त झालेला आहे.

यवतमाळ : केंद्र शासनाकडून सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी विशेष केंद्रीय सहाय्यांतर्गत पहिला हप्ता ३१ कोटी ६१ लाख २० हजार रुपयांचा प्राप्त झालेला आहे. त्यापैकी २१ कोटी रुपये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखालील येणाऱ्या मागासवर्ग विकास महामंडळ, खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. सन २०१४-१५ मध्ये केंद्र शासनाकडून वितरीत करण्यात आलेला ३० कोटी दहा लाख सात हजार रुपये इतका निधी सबंधित महामंडळांना वितरीत करण्यात आला आहे. सदर निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र शासनास सादर करण्यात आले आहे. आता केंद्राचा ५५ कोटी ३६ लाख ९६ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी पहिला हप्ता ३१ कोटी ६१ लाख २० हजार रुपयांचा पहिला हप्ता शासनास प्राप्त झाला आहे. विशेष केंद्रीय सहाय्यअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना अनुदान स्वरुपात देण्यासाठी व प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी, महामंडळांनी केलेली मागणी विचारात घेऊन २१ कोटी रुपये महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांना मंजूर करण्यात आले आहे. हा निधी खर्च करण्यासाठी शासनाने निकष ठरवून दिले आहे. या निकषाच्या अधिन राहूनच आवश्यक घटकांसाठी हा निधी खर्च करायचा आहे. (प्रतिनिधी)