शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांत तब्बल १० रुपयांनी भडकले इंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

३१ मे रोजी पेट्रोलचा दर ७६ रुपये ५० पैसे, तर डिझेलचा दर ६५ रुपये ६१ पैसे होता. १९ जून रोजी ८५ रुपये ५३ पैसे, तर डिझेलचा दर ७४ रुपये ७५ पैसे तर २० जून रोजी शहरात पेट्रोलचा दर ८६ रुपये २ पैसे तर डिझेलचा दर ७५ रुपये ३१ पैसे होता. राज्य शासनाने एप्रिल महिन्यात एक तर जून महिन्यातइंधनावर तीन रुपये अधिभार वाढविला. केंद्र शासनाने इंधनाचे दर वाढविणे अथवा कमी करण्याचे अधिकार कंपन्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम । सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंंधनाच्या दरात वाढ झाल्याने मागील पंधरा दिवसांत इंधनाच्या दरात सुमारे १० रुपयांनी वाढ झाली आहे. शनिवारी वर्ध्यात पेट्रोलचा दर ८६ रुपये २ पैसे तर डिझेलचा दर ७५ रुपये ३१ पैसे होता. या दरवाढीमुळे नागरिकांसह व्यावसायिक हतबल झाले आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे रोजगार आणि अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. परिणामी, कित्येकांसमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आता इंधनाच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊन काळात रस्त्यावर येणारी हजारो वाहने थांबली. त्याचा परिणाम इंधन विक्रीवर झाला. शहर आणि परिसरात दररोज पेट्रोल आणि डिझेलची लाखो रुपयांवर विक्री होते. मात्र, लॉकडाऊन काळात इंधन विक्रीेचे प्रमाण निम्म्यावर आले होते. त्याचा फटका पेट्रोलपंप मालकांना बसला.लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली तरी बाजारपेठेतील उलाढाल थांबल्याने इंधन टाकण्यास नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे इंधनाच्या विक्रीवर परिणाम झाला असल्याची माहिती पेट्रोलपंपमालकांनी दिली. ३१ मे रोजी पेट्रोलचा दर ७६ रुपये ५० पैसे, तर डिझेलचा दर ६५ रुपये ६१ पैसे होता. १९ जून रोजी ८५ रुपये ५३ पैसे, तर डिझेलचा दर ७४ रुपये ७५ पैसे तर २० जून रोजी शहरात पेट्रोलचा दर ८६ रुपये २ पैसे तर डिझेलचा दर ७५ रुपये ३१ पैसे होता. राज्य शासनाने एप्रिल महिन्यात एक तर जून महिन्यातइंधनावर तीन रुपये अधिभार वाढविला. केंद्र शासनाने इंधनाचे दर वाढविणे अथवा कमी करण्याचे अधिकार कंपन्यांना दिले आहेत.यामुळेही इंधन दरवाढीत भर पडली आहे. मागील २० दिवसांच्या काळात तब्बल १० रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे पेट्रोलपंप मालक राजपाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.वेळेच्या मर्यादेचाही विक्रीवर परिणामलॉकडाऊन काळात सकाळी ७ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच पेट्रोलपंप सुरू ठेवण्यास मुभा होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर सायंकाळी ६ वाजतापर्यंत पेट्रोलपंप सुरू ठेवण्यास प्रशासनाने सवलत दिली. यामुळे पेट्रोल विक्रीवर मोठा परिणाम होत असल्याचेही पेट्रोलपंपमालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढ