शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

अनिश्चित कापूस दराने शेतकऱ्यांमध्ये निराशा

By admin | Updated: February 15, 2016 02:38 IST

कापसाचे दर वधारतील आणि त्यामुळे बाजारात कापसाला थोडा अधिक दर मिळून चार पैसे आणखी हातात पडेल, ....

तेजीची आशा मावळली : राळेगावातील काही व्यापाऱ्यांचे जिनिंग प्रेसिंग बंदराळेगाव : कापसाचे दर वधारतील आणि त्यामुळे बाजारात कापसाला थोडा अधिक दर मिळून चार पैसे आणखी हातात पडेल, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाळगलेली आशा आता निराशेत बदलत चालली आहे. कापसाचे दर मागील दोन-तीन आठवड्यांपासून चार हजार ४०० रुपयाच्या जवळपासच राहात आहे. आता आणखी अधिक काळ कापूस घरात साठवून ठेवण्याची स्थिती राहिली नसल्याने शेतकऱ्यांना आता कापूस अनिच्छेने मार्केटमध्ये आणून विकावा लागत आहे. राळेगाव तालुक्यात आतापर्यंत पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस मार्केट यार्डवरून व्यापारी व सीसीआयने खरेदी केला आहे. आता केवळ खासगी व्यापाऱ्यांचीच खरेदी सुरू आहे. सीसीआयच्या केवळ चार हजार १०० रुपये हमी दराच्या खरेदीमुळे ती खरेदी बंद झाली आहे. जानेवारीपासून तेजीच्या आशेने कापूस पाच ते सहा हजार रुपये प्रती क्विंटल दराने विकला जाईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा शेतकरी बांधवांमध्ये व्यक्त केली जात होती. पण दिवसामागून दिवस जात असतानाही दरवाढ न झाल्याने आणि आता ऊन कडक होत जात असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. तालुक्यात अजूनही किमान दोन लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे असावा, असा अंदाज आहे. यावर्षी कापूस व्यवसायातील अनिश्चितता व तेजीमंदीची शक्यता पाहता अनेक लहान मोठ्या परंपरागत कापूस व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीपासून दूर राहणे पसंत केले आहे. अनेकांचे जिनिंग प्रेसिंग मागील एक-दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)