शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनर काढणार गाढवांसह मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:23 IST

शरीर थकल्याने समस्या मांडण्यासाठी इमारतीची एक पायरीही चढणे सेवानिवृत्तांना कठीण झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेचे प्रशासन सेवानिवृत्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दोन-दोन महिने त्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शरीर थकल्याने समस्या मांडण्यासाठी इमारतीची एक पायरीही चढणे सेवानिवृत्तांना कठीण झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेचे प्रशासन सेवानिवृत्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दोन-दोन महिने त्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कास्ट्राईब पेन्शनर असोसिएशन १३ मे रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्चाचे स्वरूप यावेळी अनोखे आणि तेवढेच लक्षवेधी ठरणार आहे. मोर्चात १५ ते २० गाढवांचा सहभाग करून घेतला जाणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध म्हणून मोर्चात गाढव राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महासचिव प्रभाकर जीवने यांनी कळविले आहे. बसस्थानक चौकातून नेताजी चौक, जुनी मेनलाईन चौक, इंदिरा मार्केट, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, समता मैदान आदी भागातून वाजतगाजत मोर्चा काढला जाईल. जिल्हा परिषदेवर धडकलेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. तत्पूर्वी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले जाणार आहे.मार्च व एप्रिलचे सेवानिवृत्ती वेतन पेन्शनर्सच्या बँक खात्यात तत्काळ जमा करावे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करून सुधारित दराने पेन्शन लागू करावी, वेळोवेळी वाढणारी महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, चार तारखेच्या आत सेवानिवृत्ती वेतन जमा करावे या मागण्या आहेत.

सेवानिवृत्तांच्या मोर्चासंदर्भात जिल्हा परिषदेला नोटीस देण्यात आली आहे. शांततापूर्वक मोर्चा काढला जाणार आहे. समारोप जिल्हा परिषदेसमोर होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन राजेंद्र नखाते, हेमराज धोटे, दीपक ढोले, रामटेके, रवी श्रीरामे आदींनी केले असल्याचे कळविले आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा