शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरणावर सलग दुसऱ्या दिवशी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:50 IST

शहरात जीवन प्राधिकरणच्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे विविध आजारांची लागण झाली आहे. वापरण्यायोग्यही पाणी जीवन प्राधिकरण देत नाही. दूषित पाणीपुरवठा तत्काळ थांबवून नियमित शुद्ध पाणी द्यावे, या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही जीवन प्राधिकरण कार्यालयावर संतप्त नागरिकांचा मोर्चा धडकला.

ठळक मुद्देअशुद्ध पाणीपुरवठा : शिवसेनेने दिला कार्यकारी अभियंत्यांना अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात जीवन प्राधिकरणच्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे विविध आजारांची लागण झाली आहे. वापरण्यायोग्यही पाणी जीवन प्राधिकरण देत नाही. दूषित पाणीपुरवठा तत्काळ थांबवून नियमित शुद्ध पाणी द्यावे, या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही जीवन प्राधिकरण कार्यालयावर संतप्त नागरिकांचा मोर्चा धडकला.शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. उन्हाळ्यातील दुष्काळी स्थितीत जीवन प्राधिकरणची यंत्रणा कुठेच दिसली नाही. भरपूर पावसानंतर पाणीपुरवठ्याचे प्रकल्प तुडुंब भरल्यानंतर तीन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा होईल, असा विश्वास प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र स्थिती अजूनही सुधारलेली नाही. शहरातील बहुतांश भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पाणी उपलब्ध असूनही टंचाईची समस्या भेडसावत आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने आजार वाढले आहे. इतकेच नव्हे तर शहरातील पाणी वितरणाची पाईप लाईन ठिकठिकाणी लिकेजेस असल्यामुळे मोठा अपव्यय होत आहे. पाईप लाईन घाणीच्या जागेत लिकेज असल्याने नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. जीवन प्राधिकरणाच्या शुद्धीकरण केंद्रात पाण्यावर कुठलीच प्रक्रिया होत नसल्याचे दिसून येते. प्रकल्पातून पंपिंगद्वारे ओढलेले पाणी थेट नळातून वितरित केले जात आहे. या दूषित पाण्याचा पुरवठासुद्धा नियमित होताना दिसत नाही. आॅक्टोबर महिन्यातच आठ दिवसाआड व त्याहीपेक्षा अधिक कालावधीत पाणीपुरवठा सुरू आहे. परिणामी नागरिकांना पिण्यासाठी आजही पाणी विकतच आणावे लागत आहे. यामुळे असंतोष निर्माण झाला असून सातत्याने जीवन प्राधिकरण कार्यालयावर नागरिकांचे मोर्चे धडकत आहेत.मंगळवारी महिलांनी नगरसेवकांच्या नेतृत्वात जीवन प्राधिकरणवर मोर्चा काढला. गुरुवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, संजय रंगे, नगरसेवक व शहर प्रमुख पिंटू बांगर, नगरसेवक उद्धवराव साबळे, प्रवीण पांडे यांच्यासह नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी कार्यकारी अभियंता अजय बेले यांना नळाद्वारे येत असलेल्या दूषित पाण्याचे नमूने आणून दाखविले. ते पाणी खरंच पिण्यायोग्य आहे काय, याचीही विचारणा केली. शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत व शुद्ध व्हावा, अशा मागणीचे निवेदन दिले. सोबतच परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

टॅग्स :Morchaमोर्चाShiv Senaशिवसेना