शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ मोर्चा

By admin | Updated: November 1, 2014 01:16 IST

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ गुरुवारी वणीत विविध संघटनांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

वणी : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ गुरुवारी वणीत विविध संघटनांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन राज्यपालांना पाठविण्यात आले.या हत्याकांडात संजय जाधव, जयश्री संजय जाधव, सुनील जाधव यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली़ त्यांच्या मृतदेहाची खांडोळी करून मृतदेहाची विटंबना करण्यात आली़ या दलित हत्याकांडाची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना नाही, तर काही दिवसांपूर्वीच नितीन आगे याचीही हत्या झाली होती.दलित अत्याचाऱ्याच्या घटनेत सतत वाढ होत आहे़ खैरलांजी, सोनई येथील हत्याकांड, बुलडाणा जिल्ह्यातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक काढल्याने मिरवणुकीवर झालेली दगडफेक, जळगाव जिल्ह्यात लग्न समारंभात भीमगीत वाजविले म्हणून दलित कुटुंबावर केलेला हल्ला, लातूर जिल्ह्यात मातंग समाज बांधवांची घरे जाळणे, नाशिक जिल्ह्यातील शेवगेडांग येथे दलित कुटुंबावर झालेला हल्ला किंवा नुकतेच बिड जिल्ह्यातील सौताडा येथे दलित सरपंच महिला व तिच्या परिवाराला करण्यात आलेली अमानुष मारहाण, अशा अनेक घटना घडल्या. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सर्व घडत आहे़ या घटना अतिशय लज्जास्पद असून दलितांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या असल्यामुळे तो थांबविण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. त्यातच जवखेड येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी अद्याप मोकळे आहे़ तरीही प्रशासन मूग गिळून आहे़ ही बाब सामाजिक दृष्ट्या योग्य नाही़ या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करावी, प्रकरण जलदगतीने चालवून आरोपींना कठोर शासन करावे, अन्यथा आंबेडकरी समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशांत गाडगे, मंगल तेलंग, किशोर मून, मनोज मोडक, संजय गजभिये, उल्हास पेटकर, सुधीर पडोळे, संदीप दुपारे, राजू चापडे आदींनी निवेदनातून दिला. मोर्चात वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील आंबेडकरी युवा वर्ग, विविध सामाजिक व धार्मिक संघटना सहभागी होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)