शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

By admin | Updated: July 21, 2016 00:24 IST

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी उमरखेड येथे विविध सामाजिक

तहसीलवर धडक : विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा सहभाग उमरखेड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी उमरखेड येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्यावतीने तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. आरोपींना भरचौकात फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी करीत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनांची बैठक घेवून निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे, रिपाइं, युवा सेना यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड विशे पाटील कृषी परिषद, ज.तु. सा. परिषद, अपंग संघटना, इनरव्हील क्लब, छावा संघटना, गोर सेना, सिद्धेश्वर समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा फोर्स, भीम संघर्ष समिती, सम्राट अशोक ब्रिगेड, जमाते इस्लामी हिंद, एसआयओ संघटना, फोटोग्राफर संघटना, राष्ट्रीय बंजारा क्रांती दल, श्रीराम मित्रमंडळ, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आदी सहभागी झाले होते. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून निघालेला हा मोर्चा शहरातील मार्गांवरून तहसील चौकात पोहोचला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. तहसीलसमोर झालेल्या सभेत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, राम देवसरकर, निलोफर पठाण, चितांगराव कदम, संजय बिजोरे, महेश काळेश्वरकर, शिवाजी माने, कविता मारुडकर, मजहरउल्ला खान, फिरोज अन्सारी, गौतम नवसागरे, बालाजी वानखडे यांनी विचार व्यक्त केले. यानंतर मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांना निवेदन दिले. यावेळी सुरेश कदम, चक्रधर पाटील, गुणवंत सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, जिल्हा परिषद सभापती विमल चव्हाण, नगराध्यक्ष उषा अलट, सविता कदम, छाया धूळध्वज, पुष्पा चव्हाण, रेखा भरणे, बाळासाहेब चौधरी, संदीप ढाकरे, गोपाल राठोड, अ‍ॅड.सिद्धार्थ घोंगडे, राम कदम, विश्वंभर वानखडे, जयश्री देशमुख, अ‍ॅड.जयश्री कलंत्री, अरविंद धबडगे, जिल्हा परिषद सदस्य बाळू पाटील चंद्रे, संदीप हिंगमिरे, शिवाजीराव वानखडे, सतीश नाईक, अ‍ॅड.मुडकुळे, युवराज पाटील, वसंतचे उपाध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर, दत्तराव शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)