शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

पुसद-उमरखेड येथे मराठा आरक्षणासाठी मोर्चा

By admin | Updated: November 27, 2014 23:42 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत पुसद आणि उमरखेड येथे मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात समाज

पुसद/उमरखेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत पुसद आणि उमरखेड येथे मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.पुसद येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. विविध घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोरील जयस्तंभ चौकात पोहोचला. त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी चंद्रकांंत जाजू यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले. तत्पूर्वी झालेल्या सभेत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष देशमुख यांनी आरक्षणाची कायदेशीर बाजू विशद केली. पंचायत समितीचे उपसभापती अवधूत मस्के, डॉ. समीर कदम यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मोर्चात माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, अनिरुद्ध पाटील, अशोक बाबर, नगरसेवक डॉ. भारत जाधव, डॉ. भानुप्रकाश कदम, दिगंबर जगताप, प्रा.डॉ.संजय खुपासे, प्रा.विजय कदम, आशा कदम, शुभांगी पानपट्टे, प्रा. रजनी भोयर, हेमलता काकडे, मंजुषा काकडे, सुधीर देशमुख, साहेबराव ठेंगे, अण्णासाहेब ठेंगे, राजभाऊ देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, गणेश पावडे, शेख नादरे, गणेश चौधरी, पिंटू पाटील यांनी परिश्रम घेतले. उमरखेड व महागाव तालुक्यातील हजारोच्या संख्येने जमलेल्या मराठा समाज बांधवांनी उमरखेडच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चाला प्रारंभ उमरखेडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोरुन करण्यात आला. विविध घोषणा देत नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर, प्रकाश पाटील देवसरकर, राम देवसरकर, अ‍ॅड. अनिल माने, दत्तदिगंबर वानखडे, सुरेश कदम, विलास चव्हाण, चितांगराव कदम, शिवाजी माने, तातू देशमुख, साहेबराव कदम, सीताराम ठाकरे, अनिल नरवाडे, संदीप ठाकरे, शैलेश कोपरकर, वसंत देशमुख, कपिल चव्हाण, डॉ. कल्याण राणे, दिलीप सुरोशे, अ‍ॅड. माधव माने, अ‍ॅड. बळीराम मुटकुळे, अ‍ॅड. संजय जाधव, अ‍ॅड. निर्गुन कल्याणकर यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. (वार्ताहर)