शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी नगरपरिषदेवर मोर्चा

By admin | Updated: January 29, 2015 23:16 IST

नगरपरिषदेची स्थापना होवून बराच कालावधी लोटला असून अद्यापही ग्रामपंचायत स्तरावरीलही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. याबाबत अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये रोष आहे.

विविध समस्या : मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हारआर्णी : नगरपरिषदेची स्थापना होवून बराच कालावधी लोटला असून अद्यापही ग्रामपंचायत स्तरावरीलही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. याबाबत अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये रोष आहे. आज मात्र नागरिकांचा संताप अनावर झाल्याने नगरपरिषदेवर धडक दिली. परंतु त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठीही तेथे कोणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्या खुर्चीला नागरिकांनी हार घालून आपल्या समस्यांचे निवेदन चिपकविले.आर्णी शहरातील प्रभाग क्र.१ संभाजीनगर हे विविध मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे. या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. पाणीपुरवठ्याची नियमित व्यवस्था नाही. पथदिवे नाही. तसेच मोठ्या प्रमाणात विविध समस्या प्रलंबित आहे. याबाबत वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी नोंदविल्यानंतरही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी गुरुवारी नगरपरिषदेवर धडक दिली. यावेळी नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांच्या कक्षात ठिय्या ठोकला आणि त्यांच्या खुर्चीला हारार्पण करून मागण्यांचे निवेदन खुर्चीवर चिटकविले. आंदोलनात पूनम रणमले, आमरीन चव्हाण, सोनू घाटे, शारदा गजलवार, ललिता चव्हाण, माया चव्हाण, उषा माळवे, उषा वाघाडे, वच्छला पारधी, लक्ष्मी पारधी, सीमा पाटील, चंदा गायकर, ताई वानखडे, ताई भगत आदींसह नागरिक सहभागी झाले होते. याबाबत प्रभारी मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्याशी संपर्क साधला असता आपण नव्यानेच प्रभार घेतला असून प्रत्यक्ष शहरात फिरून समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)