शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

चोरट्यांच्या टोळीची पोलिसांशी फ्रिस्टाईल

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

मुसळधार पाऊस आणि त्यातच खंडीत झालेल्या विजपुरवठ्याने अंधाराचा फायदा घेत सहा चोरट्यांची टोळी चोरीच्या प्रयत्नात होती. दरम्यान मागावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.

यवतमाळ : मुसळधार पाऊस आणि त्यातच खंडीत झालेल्या विजपुरवठ्याने अंधाराचा फायदा घेत सहा चोरट्यांची टोळी चोरीच्या प्रयत्नात होती. दरम्यान मागावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांना मारहाण करून पसार होण्याची तयारी चालविली. तब्बल अर्धातास फ्रिस्टाईल झाल्यानंतर दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. ही घटना येथील पिंपळगावातील विशाल नगरात मंगळवारी रात्री घडली.विशाल शंकर चव्हाण (१९) आणि सुनील उर्फ भुऱ्या वामन जनबंधू (२५) दोघेही रा. सुराणा ले-आउट अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहे. तर सुरेश गढीवाल, अक्षय सहारे, ऋषी आणि मोबीन सर्व रा. तलावफैल अशी त्यांच्या पसार साथिदारांची नावे आहे. एक सहा सदस्यीय चोरट्यांची टोळी विशाल नगरातील किराणा दुकानांमध्ये चोरी करण्याच्या बेतात असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकातील शिपायी आशिष गुल्हाने याला मिळाली. तत्काळ घटनास्थळ गाठून त्याने चोरट्यांवर पाळत ठेवली. दरम्यान चोरटे विशाल नगरातील सुभाष भूत यांच्या दुकानात शिरले. तेव्हा शिपायी आशिषने घटनेची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील जमादार प्रकाश साटम, विनोद राठोड यांना देवून मदतीसाठी बोलाविले. तिघांनी मिळून संबंधीत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा चोरट्यांनी त्यांना मारहाण करून पसार होण्याची तयारी चालविली. त्यांच्यात तब्बल अर्धातास फ्रिस्टाईल झाल्यानंतर दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले. त्यांचे चार साथिदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांकडून दाराची कडीत तोडण्यासाठी वापरण्यात येणारी एक सब्बल आणि अन्य साहित्य जप्त केले. तसेच त्यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून अटक केली. या चोरट्यांकडून जबरी चोरी आणि घरफोडीचे अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.(स्थानिक प्रतिनिधी)