शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा प्रकल्प कार्यालयात फ्री-स्टाईल

By admin | Updated: July 18, 2016 00:46 IST

येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील तीन कनिष्ठ लिपिकांमध्ये शनिवारी कार्यालयातच फ्री-स्टाईल झाली.

तीन कनिष्ठ लिपिकांमध्ये जुंपली : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पांढरकवडा : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील तीन कनिष्ठ लिपिकांमध्ये शनिवारी कार्यालयातच फ्री-स्टाईल झाली. या फ्री-स्टाईलचे नेमके कारण पुढे आले नसले तरी रविवारी याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या फ्री-स्टाईलची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. पांढरकवडा येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासींच्या विविध विकास योजना राबविल्या जातात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. परंतु अनेक कर्मचारी एकमेकांचा द्वेष करीत असल्याचे सांगण्यात येते. याच द्वेषभावनेतून शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शंकर भानारकर, शैलेश पडवे, दत्तात्रय गुंजोट या तिघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी कार्यालयात इतरही कर्मचारी उपस्थित होते. मात्र कुणीही त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. काही वेळात या बाचाबाचीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. तीनही कर्मचारी एकमेकांना मारहाण करीत होते. हा प्रकार पाहून कार्यालयातील इतर कर्मचारी अचंबित झाले. त्यातच प्रकल्प अधिकारी दीपककुमार मीना हेसुद्धा कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या अपरोक्ष हा प्रकार घडला. दरम्यान रविवारी त्यांनी या घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान या हाणामारीची तक्रार या कार्यालयातील कर्मचारी मनोज सातव यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून या तीनही कर्मचाऱ्यांविरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी) आदिवासी विकासाच्या योजना राबविण्यासाठी पांढरकवडा येथे प्रकल्प कार्यालय आहे. यवतमाळ या आदिवासी बहुल जिल्ह्यातील नागरिकांना या कार्यालयाचा लाभ मिळावा म्हणून येथे कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. परंतु नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेले हे कार्यालय आता कर्मचाऱ्यातील आपसी हेव्यादाव्यानेही गाजत आहे. विशेष म्हणजे प्रकल्प कार्यालयाला प्रकल्प अधिकारी म्हणून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरही या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधील सुंदोपसुंदी संपायला तयार नाही. याचा थेट परिणाम विकास योजनांवर होण्याची शक्यता आहे.