शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या ठिकाणी मोफत रक्तदाब तपासणी

By admin | Updated: May 17, 2017 00:54 IST

दैनंदिन धावपळीत स्वत:च्या रक्तदाबाकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही. खास दवाखान्यात जाऊन रक्तदाब तपासणी तर क्वचितच केली जाते.

आयएमएचे आयोजन : जागतिक रक्तदाब दिनानिमित्त आज राबविणार उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दैनंदिन धावपळीत स्वत:च्या रक्तदाबाकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही. खास दवाखान्यात जाऊन रक्तदाब तपासणी तर क्वचितच केली जाते. परंतु, त्यातूनच गंभीर आजार निर्माण होतात. ही मानसिकता ओळखून बुधवार, १७ मे रोजी यवतमाळातील तज्ज्ञ डॉक्टर थेट गर्दीच्या ठिकाणीच नागरिकांना गाठून त्यांची मोफत रक्तदाब तपासणी करून देणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या निमित्ताने हा आगळा उपक्रम आयोजित केला आहे. उच्च रक्तदाबाकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यातून हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू किंवा किडनी खराब होणे हे धोके संभवतात. त्यामुळे रक्तदाबाची नियमित तपासणी आवश्यक आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक रक्तदाब दिनी आयएमएने पुढाकार घेतला आहे. यवतमाळ शहरातील गर्दीची ठिकाणे गाठून तेथेच बुथ लावून लोकांचा रक्तदाब (बीपी) मोफत तपासून देणार आहेत. ज्यांचा रक्तदाब प्रमाणापेक्षा अधिक आढळेल, अशांना मोफत मार्गदर्शनही केले जाणार आहे. बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय अशा गर्दीच्या ठिकाणांवर तपासणी बुथ सकाळी ९ वाजतापासून सुरू राहणार आहेत. सकाळी ८ वाजता जनजागृती रॅलीही काढली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धोटे आणि डॉ. येलके रॅलीला हिरवी झेंडी दाखवतील. जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, नेताजी चौक, दत्त चौक अशा मार्गाने बसस्थानक चौकात रॅलीचा समारोप होईल. या उपक्रमात आयएमए महिला शाखा, बालरोग तज्ज्ञ संघटना, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, वैद्यकीय प्रतिनिधींची एमएसएमआरए, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मार्ड आदी विविध संघटना सहभागी होणार आहेत. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा आणि सचिव डॉ. स्वप्नील मानकर यांनी केले आहे.