शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांसाठी मोफत आॅटोसेवा

By admin | Updated: March 20, 2017 00:25 IST

मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात अंगीकारून उमरखेड शहरात मिस्त्री काम करणाऱ्या

मानव सेवा : मिस्त्री काम करणाऱ्या युवकाचा उपक्रम उमरखेड : मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात अंगीकारून उमरखेड शहरात मिस्त्री काम करणाऱ्या युवकाने रुग्णांसाठी मोफत आॅटोसेवा सुरू करून समाजापुढे समाजसेवेचे एक नवे उदाहरण पुढे आणले आहे. शहरातील काझीपुरा येथील सै.सादिक सै.अब्दुल रहेमान या मिस्त्री काम करणाऱ्या युवकाने दरमहा १५ हजार रुपयांचा खर्च उचलून रुग्णांसाठी मोफत आॅटोसेवा सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ढाणकी मार्गावर भीषण अपघात झाला होता. त्या अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नव्हते. ही घटना सादिक यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या पैशाने आॅटो करून जखमींना रुग्णालयात पोहोचविले. या घटनेने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला. रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी त्यांनी रुग्णसेवेचा ध्यास घेतला आणि रुग्णांसाठी विनामूल्य आॅटोसेवा सुरू केली. त्यासाठी पदरमोड करून त्यांनी आॅटो घेतला. हा आॅटो २४ तास केवळ रुग्णसेवेसाठी उमरखेड शहरात फिरत असतो. त्याचा शेकडो रुग्णांना फायदा होत आहे. मिस्त्री काम करून रुग्णांच्या सेवेसाठी सतत झटणाऱ्या सै.सादिक रहेमान याच्या सामाजिक कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. तसेच समाजातील इतरही दानशूर मंडळींनी यातून प्रेरणा घेवून अशा प्रकारचे उपक्रम राबवावे, असा एक सूर जनमाणसातून उमटत आहे. (शहर प्रतिनिधी)