शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अरुणावती पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

By admin | Updated: January 12, 2015 23:00 IST

बंद अवस्थेत असलेली अरुणावती पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी गेली दोन महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या नगरपरिषदेला अखेर यश मिळाले आहे.

दारव्हा : बंद अवस्थेत असलेली अरुणावती पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी गेली दोन महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या नगरपरिषदेला अखेर यश मिळाले आहे. उन्हाळ्यात दारव्हा शहराची तहान भागविण्याकरिता एकमेव पर्याय असलेल्या या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी एक कोटी रुपये मिळाले असून कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर योजनेच्या कामासाठी एक कोटी २७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पैकी एक कोटी एक लाख ६० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून तर उर्वरित २० टक्के रक्कम नगरपरिषदेला खर्च करावी लागणार आहे. निधी मिळाल्यामुळे आता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन योजनांमधील मोठी असलेली पेकर्डा योजना यावर्षी म्हसणी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने काही दिवसातच बंद पडू शकते. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ६० टक्के भागाला पाणीटंचाईला सामोरे जावू लागू शकते. हा धोका लक्षात घेता नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी आधीपासूनच अरुणावती पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. एवढ्या महत्त्वाच्या विषयात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने योजनेचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाठविण्यात आला. याची त्वरित दखल घेत त्यांनी नागपूर येथे बैठक घेतली. त्यावेळी नगराध्यक्ष चिरडे यांनी अरुणावती योजना सुरू न झाल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होवू शकते. त्यामुळे या योजनेच्या कामासाठी निधी देण्याची मागणी केली. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या. उशिरा का होईना नगरपरिषदेला या योजनेच्या कामासाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे कामाच्या प्रक्रियेला सुरुवातदेखील झाली आहे. शनिवारी यवतमाळ येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी, नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांची बैठक पार पडली. योजनेचे काम तत्काळ सुरू होण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)