शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जनधन योजनेच्या खातेदारांची फसवणूक

By admin | Updated: November 26, 2014 23:15 IST

पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून राबविल्या जात असलेल्या जनधन योजने अंतर्गत पुसद येथे बँकेच्या खातेदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संगणक केंद्रचालकांचा प्रताप : नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पुसद : पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून राबविल्या जात असलेल्या जनधन योजने अंतर्गत पुसद येथे बँकेच्या खातेदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथील संगणक केंद्र संचालक हे खातेदारांकडून जनधन योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी प्रत्येकी १०० रुपये घेत आहेत. त्यामुळे या योजनेत प्रचंड गैरव्यवहार होत असल्याचा आरोप पुसद भाजपाच्यावतीने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पुसद शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच या योजनांतर्गत खाते उघडणाऱ्या नागरिकांनी कुठेही पैसे देऊ नये असे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे. पुसद तालुक्यात स्टेट बँकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडणे सुरू आहे. या योजनेंतर्गत झिरो बॅलन्सवर नागरिकांना खाते उघडता येते. असे असताना येथील सुभाष टॉकीज समोरिल विद्यानंद झेरॉक्स या दुकानातून खाते उघडताना १०० रुपयांची मागणी केली जात आहे. शहरातील कार्ला रोडवरील एका शाखेने प्रत्येक खातेदारांकडून २० रुपये वसुल केले आहे. तसेच शहरालगतच्या श्रीरामपूर येथील मिलिंद काकड नामक व्यक्ती हे खाते उघडण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी १०० रुपये घेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नागरिकांकडून या योजनेसाठी पैसे उकळणाऱ्या अशा परवाना धारकांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात यावे व ग्राहकांचे पैसे त्यांना परत देण्यात यावे तसेच नागरिकांची लूट थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने बँक व्यवास्थपकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भारत पाटील, सरचिटणीस संतोष मुके, उपाध्यक्ष बाळासाहेब उखळकर, विश्वजीत सरनाईक, संतोष आर्य आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)