शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चौदाव्या वित्त आयोगाचा ६० टक्के निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:28 IST

गावाच्या विकासासाठी दिला जाणारा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी योग्य नियोजनाअभावी परत जाण्याची शक्यता वाढली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेली चालढकल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देचौदाव्या वित्त आयोगाचा निधी योग्य नियोजनाअभावी परत जाण्याची शक्यता

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : गावाच्या विकासासाठी दिला जाणारा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी योग्य नियोजनाअभावी परत जाण्याची शक्यता वाढली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेली चालढकल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील केवळ ४० टक्के निधी खर्च झाला आहे.प्रतिव्यक्ती ४०९ रुपये याप्रमाणे गावाला चौदाव्या वित्त आयोगातून निधी दिला जातो. ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये रक्कम टाकली जाते. ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार या निधीतून कामे हाती घेतली जातात. एक हजार लोकसंख्येच्या गावाला चार लाख नऊ हजारांचा निधी प्राप्त होतो. मात्र हा निधी खर्च करण्यास अधिकाºयांकडे कुठलेही नियोजन नाही. परिणामी गावाच्या विकासाला खीळ बसला आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी तालुक्यातील ग्रामपंचायतींना मिळाला. आरोग्य, शिक्षण, रोजगार, घनकचरा, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या नाल्या आदी सुविधांसाठी हा निधी वापरला जावू शकतो. यासाठीचे नियोजन मात्र केले जात नाही. कामाचे नियोजन आणि खर्चाविषयी चर्चेसाठी दर १५ दिवसांनी बैठक घेणे अपेक्षित आहे. याकडे दुर्लक्ष केले गेले.महिला बालकल्याण, मागासकल्याण क्षेत्र, दिव्यांग आदींसाठी या निधीतून कामे अथवा मदत अपवादानेच झाली आहे. ग्रामीण रस्ते, आरोग्य या समस्या भीषण झाल्या आहे. निधी असूनही केवळ दुर्लक्ष झाल्याने लाखो रुपये ग्रामपंचायतींच्या खात्यात पडून आहे. तालुक्यात या योजनेची पुरती वाट लागली आहे. गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा योग्य उपयोग व्हावा, अशी अपेक्षा आहे.पाणीटंचाई उपाययोजनासुद्धा नाहीनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. गावासह शेतशिवारातील जलस्त्रोत आटले आहे. टँकरवर तहान भागवावी लागत आहे. ग्रामपंचायतींकडे पैसा आहे. मात्र कारणांचा पाढा वाचत टंचाई दूर करण्यात चालढकल केली जात आहे. अशावेळी निधीचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.