शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

चार बळींनी वणी पोलीस रस्त्यावर

By admin | Updated: February 21, 2016 02:06 IST

‘वाहन चालकांवर जरब आवश्यक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रकाशित करताच वाहतूक पोलिसांनी अवैध वाहतुकीविरूद्ध शनिवारी एल्गारच पुकारला.

अवैध प्रवासी वाहनांविरूध्द मोहीम : आॅटोरिक्षांवर कारवाई, आता सर्वच जागे झाले, कारवाई-बैठकांचा धडाकावणी : ‘वाहन चालकांवर जरब आवश्यक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रकाशित करताच वाहतूक पोलिसांनी अवैध वाहतुकीविरूद्ध शनिवारी एल्गारच पुकारला. शहरातील अनेक चौकात शनिवारी जादा प्रवासी भरून नेणाऱ्या आॅटो चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. गुरूवारी येथील मॅक्रून स्टुडंट अ‍ॅकेडमीच्या चार विद्यार्थ्यांचा अपघातात बळी गेला होता. या घटनेने अख्ख्या जिल्ह्यावर शोककळा पसरली होती. शुक्रवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मृतकांचे घर व घटनास्थळ भेट दिली होती. त्यानंतर ‘लोकमत’ने ‘वाहन चालकांवर जरब आवश्यक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत वाहतूक पोलीस निरीक्षक असलम खान यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहनात जादा प्रवासी असणाऱ्या आॅटोंविरूद्ध धडाकेबाज कारवाईला सुरूवात केली. काही शाळांमध्ये स्कूल बसची व्यवस्था आहे. मात्र त्यातील बहुतांश बस बाहेरगावी पाठविल्या जातात. परिणामी विद्यार्थ्यांना गासगी वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागतो. खासगी वाहनधारक वाहनात मर्यादेपेक्षा जादा विद्यार्थी नेतात. एवढेच नव्हे तर एकच खासगी वाहनधारक अनेक खेपा मारत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत शनिवारी शहरातील बसस्थानक चौक, टिळक चौक व साई मंदिर चौकात वाहूतक पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला. ग्रामीण भागातील येणाऱ्या अवैध वाहन चालकांवर या चौकात कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे आॅटो चालकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. आॅटो चालकांवरील या कारवाईमुळे साई मंदिर ते टिळक चौकापर्यंतचा रस्ता मोकळा दिसून येत होता. या मार्गावरील आॅटो कुठे गायब झाले, कुणालाही कळत नव्हते. एकूणच वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचे शहरात स्वागत होत आहे. होते. मात्र वाहतूक पोलिसांची ही कारवाई कायस्वरूपी सुरू राहिल्यास शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम लागण्याची शक्यता आहे. अन्यथा पुन्हा चार दिवसानंतर तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सजग राहणे गरजेचे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)चौघांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण ?कारणांचा संभ्रम : अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेटवणी : येथे चार शाळकरी चिमुरड्यांचा बळी घेऊन सहा विद्यार्थ्यांना जखमी करणाऱ्या अपघाताच्या घटनेला नेमके जबाबदार कोण?, याबाबत अद्यापही तपास यंत्रणांचे एकमत झालेले नाही. प्रत्येक जण वेगवेगळी कहानी सांगत असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) श्रीपाद वाडेकर यांनी शुक्रवारी या अपघात स्थळाला प्रत्यक्ष भेट दिली. चौघांचा बळी घेणाऱ्या अपघाताच्या या घटनेत चूक नेमकी कोणाची?, ट्रक चालकाची की व्हॅन चालकाची, याबाबत संभ्रम आहे. कुणी कोळशाचा ट्रक चुकीच्या दिशेने येत होता, असे सांगत आहे. कुणी व्हॅनचा चालक मोबाईलवर बोलत होता, असे सांगत आहे, तर कुणी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे बोलत आहे. मात्र तपास यंत्रणा अद्याप ठोस निष्कर्षावर पोहोचलेली नसल्याचे सांगण्यात आले. अमरावतीचे आरटीओ श्रीपाद वाडेकर यांनी ‘स्पॉट व्हीजिट’ केली. त्यावेळी रस्ता सरळ आणि व्यवस्थित असल्याची आणि तेथे दिशादर्शक फलकांची कोणतीही आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी घटनास्थळी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. सदर व्हॅनला ‘सात अधिक एक’चा परवाना मंजूर असताना त्यात दहा विद्यार्थी कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केल्याचे समजते. पुन्हा असे अपघात होणार नाहीत, या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना वाडेकर यांनी केल्या. यवतमाळचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अपघात स्थळावर विलंबाने पोहोचल्याचा मुद्दा समोर आला असता, जमावाची मानसिकता ओळखून आणि प्रशासनावर ताण येणार नाही याची काळजी घेऊन व प्रशासनाला विश्वासात घेऊनच थेट संबंध येणाऱ्या यंत्रणेने घटनास्थळी भेट देणे योग्य ठरत नसल्याचे आरटीओंनी उपस्थितांना सांगितल्याचे समजते. (कार्यालय प्रतिनिधी) सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मनसेची मागणीगुरूवारी अपघातात चार चिमुकल्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित आॅटो चालक, मालक, रस्ता बांधकाम करणारी आयव्हीआरसीएल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संंबंधितांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सनेने केली. चार निरागस चिमुकल्यांच्या मृत्यूने शहरासह पूर्ण राज्यात हळहळ व्यक्त झाली. मात्र त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले अद्याप मोकाट फिरत आहे. त्यांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी मनसेने केली. रस्ता सुरक्षा नियांचे पालन न केल्याने चिमुकल्यांचा जीव गेला, असा आरोप मनसेने केला. यापूर्वी मारेगाव तालुक्यातही एका युवकाला जीव गमवावा लागला. त्यावेळी मनसेने पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. मात्र त्याकडे पोलिसांनी कानाडोळा केला. किमान आता तरी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आंदोलन करेल, असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी उपविभागीय अधिकारी, ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.एसडीओंनी बोलाविली तातडीची बैठकअपघातानंतर आता प्रशासनही खडबडून जागे झाले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात शनिवारी एक तातडीची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस प्रशासन, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालयांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.