शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:46 IST

ऑनलाईन लोकमत दारव्हा : तालुक्यात अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव गरजू शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. सध्या हा बाजार तेजीत असून शासनाच्या उदासीन धोरणामुळे तब्बल चार हजार क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेला आहे.यावर्षी शेतमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर झाल्यानंतर शासनाने जाहिरातबाजी करून शेतमाल ...

ठळक मुद्देदारव्हा तालुका : शासकीय खरेदी केंद्राची अद्यापही प्रतीक्षा

ऑनलाईन लोकमत दारव्हा : तालुक्यात अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव गरजू शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. सध्या हा बाजार तेजीत असून शासनाच्या उदासीन धोरणामुळे तब्बल चार हजार क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेला आहे.यावर्षी शेतमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर झाल्यानंतर शासनाने जाहिरातबाजी करून शेतमाल विक्रीकरिता आॅनलाईन नोंदणी करावी तसेच शासकीय खरेदी केंद्रावर माल विक्रीकरिता आणण्याचे आवाहन केले. परंतु कापसाचे पीक हातात पडून महिना झाला तरी दारव्हा तालुक्यात कापूस विक्रीसाठी ना नोंदणी करून घेण्यात आली ना शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. परिस्थिती एवढी बिकट आहे की अद्याप सेंटर सीसीआय की पणन महासंघाने सुरू करावे याचाही निर्णय झाला नाही. या दोन एजंसीमध्ये फक्त टोलवाटोलवी सुरू आहे. राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या यवतमाळ येथील कार्यालयात विचारणा केली तर दारव्हा सेंटर सीसीआयकडे असल्याचे सांगण्यात येते आणि सीसीआयचे अधिकारी पुरेसा स्टाफ नसल्याचे कारण पुढे करतात. त्यामुळे इतर ठिकाणी महिनाभरापासून कापूस खरेदी सुरू असताना दारव्हा तालुक्यात मात्र अद्याप खरेदीचा मुहूर्त सापडला नाही. या खेळखंडोबामुळे खासगी व्यापाऱ्यांचे चांगले फावत आहे. गरजू शेतकऱ्यांना लेटलतिफ धोरणामुळे विलंब लागत असलेल्या शासकीय कापूस खरेदीची वाट पाहणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना आपला माल मिळेल त्या भावात खुल्या बाजारात विकावा लागतो. सध्या मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीला येत असल्याने अनेक व्यापाºयांनी आपली दुकाने थाटली आहे.आर्णी मार्गावर तर या दुकानांच्या रांगा लागल्या आहे. बाजार समितीच्या आकडेवारीनुसार जवळपास चार हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खुल्या बाजारात येवूनसुद्धा शासकीय केंद्र उघडण्याच्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांत नाराजी आहे. त्यामुळे दारव्हा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकºयांना शासनाने वाºयावर सोडले की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राजकीय नेते गप्पचमहिनाभरापासून तालुक्यात कापसाचा बाजार तेजीत असताना अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. तरीसुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही. सत्ताधारी, विरोधी सर्व राजकीय नेते गप्प असून नेत्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.