शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जिल्ह्यात चार अपघातात चौघे ठार

By admin | Updated: January 25, 2015 23:22 IST

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. नेर तालुक्यातील मुखत्यारपूरजवळ सहा वर्षीय बालक, लासीनाजवळ तरुण, चिल्ली येथे इसम तर दारव्हा तालुक्यातील कामठवाडाजवळ वृद्ध ठार झाला.

यवतमाळ : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले. नेर तालुक्यातील मुखत्यारपूरजवळ सहा वर्षीय बालक, लासीनाजवळ तरुण, चिल्ली येथे इसम तर दारव्हा तालुक्यातील कामठवाडाजवळ वृद्ध ठार झाला. ब्राह्मणवाडा येथील काही जण भिलटेक यात्रेसाठी आॅटोरिक्षाने (एम.एच. २९/व्ही-८२०८) जात होते. मुखत्यारपूर-धनज वळणावर रविवारी सकाळी १०.३० वाजता आॅटोरिक्षा उलटून सुजल घनश्याम राठी (६ वर्षे) रा. ब्राह्मणवाडा (पूर्व) हा ठार झाला. तर धुर्पता भगवान राठोड (६०), सचिन हरिहर चरडे (१८), विठ्ठल कोल्हे (४४) हे गंभीर जखमी आहेत. त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले. आॅटोरिक्षा चालक घनश्याम राठोड, पार्वतीबाई राठोड, प्रज्ज्वल मडावी, सायली राठोड या जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. यवतमाळकडून नेरकडे भरधाव वेगाने जाणारी दुचाकी लासीना येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या ड्रमवर जाऊन आदळली. त्यात अमोल रंगारी (२६) रा. टाकळी सलामी ता. नेर हा ठार झाला. तर त्याचा मित्र गणेश कोसाटी (२८) हा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. तिसरी घटना उमरखेड तालुक्यातील चिल्ली येथे घडली. गावातीलच किसन रामसिंग पवार (५८) हे किराणा आणण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने (एम.एच.३१-सी.क्यू-२४२१) रविवारी सकाळी १० धडक दिली. त्यात किसन पवार जागीच ठार झाले. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दारव्हा तालुक्यातील कामठवाडाजवळील गोखी मारुती मंदिराजवळ क्रुझने दिलेल्या धडकेत किसन गणपत पवार (६०) रा. कामीनदेव हा जागीच ठार झाला. तो पायदळ जात असताना एका प्रवासी क्रुझरने त्याला धडक दिली. (लोकमत चमू)