शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळाचे चार कोटी बांधकामच्या तिजोरीतच

By admin | Updated: December 15, 2015 04:30 IST

पुलाच्या बांधकामासाठी बेंबळा कालवे विभागाकडून घेतलेले चार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत पडून

विलास गावंडे ल्ल यवतमाळ पुलाच्या बांधकामासाठी बेंबळा कालवे विभागाकडून घेतलेले चार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत पडून आहे. गेली एक वर्षापासून कामाला सुरुवातच करण्यात आली नाही, तर दुसरीकडे सुमारे नऊ हजार हेक्टर सिंचन प्रभावित झाले आहे. वारंवार तोंडी सूचना आणि पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभाग जुमानत नाही. त्यामुळे बेंबळा कालवे विभागाने बांधकाम विभागाला रक्कम परत मागितल्याची माहिती आहे. बेंबळा प्रकल्प पूर्ण होऊन सात वर्षांपूर्वीच सिंचनासाठी मोकळा करून देण्यात आला आहे. जवळपास १६५ किलोमीटर कालव्यांची निर्मिती करून चार तालुक्यातील गावांना सिंचनासाठी पाणी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र या कामांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा आलेख सातत्याने वाढत आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाचा असहकारही सुरू आहे. कालवा मार्गात येणाऱ्या रस्त्यांवर पुलाची उभारणी करण्यासाठी बेंबळा कालवे विभागाने गेली एक वर्षात बांधकाम विभागाला ३ कोटी ९० लाख रुपये दिले आहे. जानेवारी, मार्च आणि सप्टेंबर २०१५ अशा तीन टप्प्यात निधी दिला जावूनही बांधकाम विभागाने अजूनही कामाला सुरूवात केली नाही. कामांना विलंब होत असल्याने कामांची किंमत सातत्याने वाढत आहे. लाखांचे काम कोटींवर पोहोचले आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या इस्टिमेटनुसार निधी देण्यात आला. यानंतरही कामे सुरू करण्यात कोणत्या अडचणी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पुलाची सर्व कामे मुख्य कालवा मार्गावरील आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पांढरकवडा कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. मागणीनुसार पुरविला निधी४मुख्य कालवा आणि वितरण प्रणालीतील प्रमुख जिल्हा मार्गावर पुलांच्या कामाला अजूनही हात लागलेला नाही. दहेगाव-कुंभा रस्ता, कोपरी-अंतरगाव मार्ग, वडकी-खैरी-करणवाडी, वाढोणाबाजार-आठमुर्डी, वाढोणाबाजार-वेडशी, वाढोणाबाजार-वडकी, वडकी-राळेगाव, राळेगाव-वाढोणाबाजार-वडकी, सावंगी-येवती या रस्त्यांवर पूल उभारणीसाठी बांधकाम विभागाला निधी देण्यात आला आहे. मात्र प्रत्येक कामासाठी आवश्यक तेवढा आणि मागणीनुसार निधी देण्यात आला. कामाला केव्हा सुरुवात होणार याची प्रतीक्षा बेंबळा कालवे विभागाला आहे. एका पुलाअभावी सात हजार हेक्टरचे सिंचन अडलेदहेगाव-कुंभा या प्रमुख जिल्हा मार्गावर पूल नसल्याने सुमारे ७ हजार २३८ हेक्टर क्षेत्रातील सिंचन थांबले आहे. या कामासाठी १ कोटी १० लाख ४० हजार रुपये १३ जानेवारी २०१५ रोजी सार्वजनिक बांधकामच्या पांढरकवडा विभागाला निधी देण्यात आला. सिंचनासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरू असताना बांधकाम विभागाची दिरंगाई यात खोडा ठरत आहे.