शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

चार निरागस जीव शाळेऐवजी देवाघरी गेले

By admin | Updated: February 19, 2016 02:41 IST

मुलांनी शाळेची तयारी केली, आईने टिफिन बॉक्स, वॉटरबॅग भरून दिली. आईने मुलांना अन् मुलांनी आईला ‘बाय’ केला.

वणी : मुलांनी शाळेची तयारी केली, आईने टिफिन बॉक्स, वॉटरबॅग भरून दिली. आईने मुलांना अन् मुलांनी आईला ‘बाय’ केला. विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेले वाहन नजरेआड होऊन काहीच मिनिटे झाली अन् एक भयावह वार्ता साऱ्या वणी शहरात वाऱ्यासारखी पसरली. अपघात झाला अन् पाहता-पाहता चार निरागस जीव शाळेऐवजी देवाघरी गेले... कायमचे! आईच्या काळजाचे हे तुकडे चिरडणारा ट्रक होता कोळशाचा... काळ बनून आलेला!गुरूवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने चार विद्यार्थ्यांचा बळी घेतला. चिमुकल्यांचा बळी गेल्याने वणीच नव्हेतर अवघा जिल्हा गहिवरला. अपघात होताच सोशल मीडियावरून ही कुवार्ता काही क्षणातच जिल्हाभर पसरली. प्रत्येक पालक मुलांना शाळेत पाठवून निर्धास्त झालेला असतानाच ही वार्ता मोबाईलवर धडकली. त्यामुळे यवतमाळ, पुसद, नेर, घाटंजी, पांढरकवडा, आर्णीसारख्या प्रत्येक गावातील पालकांच्या काळजात चर्र झाले. अशा बेफाम वाहतुकीने कुणाच्याही मुलाचा बळी जाणे शक्य आहे, या कल्पनेने अपघाताचे ‘मॅसेज’ भराभर फारवर्ड होत होते. अपघाताची वार्ता मॅक्रून स्टुडंट अ‍ॅकेडमी या शाळेत पोहोचताच शाळेत याआधी पोहोचलेले विद्यार्थी प्रचंड घाबरून गेले होते. प्राचार्यांनी शाळेला सुटी जाहीर करून मृत विद्यार्थ्यांप्रती शोक व्यक्त केला. आपले सवंगडी गेल्याच्या वार्तेने शाळेतील विद्यार्थी हादरले होते. मात्र नेमका आपला कोणता सवंगडी अपघातात मृत्यू पावला, याचा ठावठिकाणा चिमुकल्या विद्यार्थ्यांना लागत नसल्याने प्रत्येकजण आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांची विचारपूस करीत होता. तर घरी अपघाताची नेमकी माहिती मिळत नसल्याने सर्वच पालक गोंधळून गेले होते. महिलांनी तर प्रचंड धास्ती घेत रूग्णालयाकडे मिळेल त्या वाहनाने धाव घेतली होती. ग्रामीण रूग्णालय परिसरात अत्यंत शोकाकूल वातावरण होते. बसस्थानक ते ग्रामीण रूग्णालयाचा मार्ग गर्दीने गजबजलेला होता. वाहन समोर काढण्यासही जागा मिळत नव्हती. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मुकुटबन, शिरपूर, मारेगाव येथील पोलीस पथकाला पाचारण करावे लागले होते. अपघाताची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सुचिता पाटेकर आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) चिंतामण वंजारी यांनी वणीकडे धाव घेतली. घटनास्थळासह मृत विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. (कार्यालय प्रतिनिधी)बहीण गेली, भाऊ वाचला४भाऊ-बहीण एकाच शाळेत असल्याने ते एकाच वाहनात निघाले होते. या अपघातात श्रद्धा प्रदीप हुलके ही चिमुकली ठार झाली. त्याच वाहनात तिचा छोटा भाऊ श्रेयस प्रदीप हुलकेही होता. तो गंभीर जखमी झाला. मात्र अद्याप त्याला बहीण गेल्याचे माहीत नाही. हुलके कुटुंबीय मुळचे आंध्रप्रदेशातील दहेगाव (बेला) येथील रहिवासी आहे. श्रद्धाचा मृतदेह घेऊन कुटुंबीय मूळगावी गेले. श्रेयस मात्र येथील खासगी रूग्णालयात दाखल होता. आता त्याला वणीतील एका नातेवाईकाकडे नेण्यात आले आहे. अपघातात देऊळकर कुटुंबातील गौरव हिरामण देऊळकर हा चिमुकला ठार झाला. त्याचा चुलत भाऊ निशांत यादव देऊळकर हा जखमी झाला. मात्र त्यालाही आपला चुलत भाऊ गेल्याचे कळले नाही. सुदैवाने या अपघातातून तो बचावला.