शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कोदोरी येथील चार घरे आगीत भस्मसात

By admin | Updated: March 5, 2017 01:09 IST

येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोदोरी येथील चार घरांना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास

पाटणबोरी : येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोदोरी येथील चार घरांना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत तीन लाखांचे नुकसान झाले आहे. कोदोरी येथील व्यंकटराव अल्लुरवार यांचे पैैनगंगा नदीच्या काठावर शेत आहे. या शेतीच्या कुंपणावरून जाणाऱ्या इलेक्ट्रीक तारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडली. या ठिणगीमुळे पोचीराम कापडे यांच्या घराजवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. त्यानंतर कापडे यांच्या गोठ्याला सर्वप्रथम आग लागली. ही आग किसन करतू कापडे यांच्याही गोठ्याला लागली. पोचीराम कापडे यांचे या आगीत घर व गोठा जळून खाक झाला. त्यात टी.व्ही., फोन, धान्य, कापड व इतर साहित्य जळून खाक झाले. यामध्ये त्यांचे दीड लाखांचे नुकसान झाले. किसन कापडे यांच्या घर व गोठ्याला लागलेल्या आगीत ५० हजारांचे नुकसान झाले. विठ्ठल इस्तारी मत्ते यांच्या घराला मागून आग लागल्याने त्यांचे घरही अर्धे जळाले. यात ५० हजारांचे नुकसान झाले. पोचूबाई कापडे यांच्याही घराला आग लागून जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन घरांवर पाणी मारले. त्यामुळे अर्धी आग आटोक्यात आली होती. त्यानंतर आदिलाबाद व पांढरकवडा येथील अग्नीशमन दलही घटनास्थळी पोहोचले. या दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळाला तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार यांनी भेट दिली. (वार्ताहर)