शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अतिक्रमणप्रकरणी चार ग्रामसेवकांना ‘शो कॉज’

By admin | Updated: June 22, 2016 02:27 IST

तालुक्यातील वाई (रूई) येथे एका संस्थेने ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेत अतिक्रमण करून व्यायामशाळा थाटली.

संस्थेवर गुन्हा : वाई येथे थाटली व्यायामशाळायवतमाळ : तालुक्यातील वाई (रूई) येथे एका संस्थेने ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेत अतिक्रमण करून व्यायामशाळा थाटली. या प्रकरणात तत्कालीन चार ग्रामसेवकांना दोष धरून निलंबनाची कारवाई का करण्यात येऊन नये अशी नोटीस बजावली आहे. तर अतिक्रमण करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. वाई येथील तत्कालीन ग्रामसेवक सविता बोरखडे, एस.व्ही. भोयर, एन.डी. देवळे, प्रवीण कावलकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायतच्या जागेत खोटा ठराव आणि नमुना-८ देऊन अतिक्रमण करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई का करण्यात येऊन नये, याचा खुलासा तीन दिवसाच्या आत करावा, असे निर्देश या ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत इमारतीमध्ये कान्हा ग्रामीण विकास बहुद्देशिय सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चंपत आरेकर यांनी दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांच्य विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी दिपक सिंगला यांनी दिले आहेत. वाई येथील ग्रामस्थ प्रशांत देवतके यांच्या तक्रारीवरून हा भुखंड घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यात लिप्त ग्रामसेवकांवरही कारवाई कोणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)