शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

एकाच दिवशी चार शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: January 31, 2015 00:20 IST

एकट्या यवतमाळ जिल्यात आज चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत, येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात कळंब तालुक्यातील ...

यवतमाळ : एकट्या यवतमाळ जिल्यात आज चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत, येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात कळंब तालुक्यातील देवनाला येथील तुलसीराम राठोड व सोनेगाव येथील देवराव भागवत तर घाटंजी तालुक्यातील बोदडीचे बन्सी राठोड तर केळापूर तालुक्यातील मोहदा येथील प्रकाशभाऊ कुतरमारे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असता या शेतकऱ्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सरकारने केली आहे. सध्या दुष्काळग्रस्त शेतकरी तुरीचे व कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाल्याने त्रस्त असून सरकारी खरेदी होत नसल्याने व्यापारी मंदीचा हवाला देत लूटत आहेत, विदर्भात या महिन्यात आणखी ५८ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व सतत नापिकीला तसेच भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभेत सातबारा कोरा करणे व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण करणे तिजोरी खाली असल्यामुळे शक्य झाले नाही. त्यामुळेच ह्या आत्महत्या झाल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकारी मात्र शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती सरकारला देत नाहीत. सरकारी मदतही तटपुंजी देण्यात येत असून त्यातही विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला .सरकारने घोषित केलेली मदतही मिळत नसल्याच्या आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला असून म्दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान, संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करावी, सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करावी, सर्व शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी द्यावे तसेच सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ देण्यात यावे या मागण्यांची पूर्तता त्वरित न झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता विदर्भ जनआंदोलन समितीने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)