शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीला चार कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:36 IST

यंदा कधी नव्हे ते कापूस व धान्य व्यापाऱ्यांनी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे. परिणामी बाजार समितीला चार कोटी रुपयांचा फटका बसला.

ठळक मुद्देटाळे लावण्याची वेळ : दोन हजार कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा कधी नव्हे ते कापूस व धान्य व्यापाऱ्यांनी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे. परिणामी बाजार समितीला चार कोटी रुपयांचा फटका बसला. परिस्थिती अशीच कायम राहिली, तर नजिकच्या काळात या बाजार समितीला टाळे लावावे लागणार आहे. परिणामी बाजार समितीवर विसंबून असलेल्या दोन हजार कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.मागील वर्षी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीने २० पैैसे सेस केला होता. त्यावेळी वणीच्या बाजार समितीत विक्रमी कापूस खरेदी झाली. मात्र नंतर बाजार समितीने आकारलेल्या या सेसवर पणन महामंडळाने आक्षेप घेतल्याने बाजार समितीला हा सेस २० पैशावरून ५५ पैैसे करावा लागला. तसेच व्यापाऱ्यांकडून २० पैैशाच्या अतिरिक्त ३० पैैसे सेस वसुल करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे बाजार समितीने संबंधित १८ व्यापाºयांविरुद्ध सहाय्यक निबंधकांकडे सेस वसुलीबाबत प्रकरण दाखल केले. या घडामोडींमुळे संबंधित व्यापारी नाराज झालेत आणि यंदा या व्यापाºयांनी वणीच्या बाजार समितीवर अघोषित बहिष्कारच टाकला. सीसीआयने बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू केले. मात्र बोटावर मोजण्याईतक्या शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस दिला. इकडे खासगी बाजार समितीत शेतकºयांनी गर्दी केली. त्यामुळे खासगी बाजार समितीत १ डिसेंबरपर्यंत सव्वा दोन लाख क्विंटल कापूस व्यापाºयांनी खरेदी केला.धान्य व्यापारीदेखील वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदी करायला तयार नाहीत. परिणामी बाजार समितीत सध्या शुकशुकाट आहे. सोयाबीनची आवक सध्या वाढली आहे. तीन हजारापर्यंत भाव मिळत असल्याने काही शेतकरी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. एकूणच निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एपीएमसीला पुन्हा जुने दिवस येतील काय, अशी भीती व्यक्त होत आहे. बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना दरमहा साडेपाच लाख रुपये वेतन द्यावे लागते. त्यामुळे वेतनाचा प्रश्न गंभीर होणार आहे.निर्णय घेण्याचे अधिकार हवे - संतोष कुचनकारवणी कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. सेसच्या विषयात स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अधिकार दिल्यास निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर मात करता येईल, असे एपीएमसी सभापती संतोष कुचनकार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.