शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकररावांच्या काळात राज्याच्या विकासाचा पाया

By admin | Updated: August 24, 2016 01:07 IST

सुधाकरराव नाईकांची कारकीर्द राज्याच्या विकासाचा पाया भक्कम करणारी होती. त्यांनी मुख्यमंत्री काळात अनेक विकास कामे केली.

मनोहरराव नाईक : जयंतीनिमित्त मारवाडी व वसंतवाडी येथे विविध कार्यक्रमपुसद : सुधाकरराव नाईकांची कारकीर्द राज्याच्या विकासाचा पाया भक्कम करणारी होती. त्यांनी मुख्यमंत्री काळात अनेक विकास कामे केली. पाण्याचे महत्व ओळखून जलसंधारण खात्याची निर्मिती केली. त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द अल्प असली तरी कायम स्मरणात राहणारी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी केले. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील मारवाडी बु. व वसंतवाडी येथे डीजिटल शाळेचे उद्घाटन व रोगनिदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, उपसभापती विवेक मस्के, ययाती नाईक, के.डी. जाधव, सदबाराव मोहटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोयर, जयवंतराव पाटील, बाजार समिती सभापती दिलीप बेंद्रे, दयाराम चव्हाण, दिलीप पारध, राजेश आसेगावकर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवाजीराव मोघे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षाला राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन लालदिव्याची गाडी सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्री काळात मिळाली. जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राज्यभर यशस्वी केल्याचे सांगितले. रोगनिदान शिबिरात डॉ. अविनाश जाधव, डॉ. अनिल राठोड, डॉ. आशिष कदम, डॉ. विद्या राठोड, डॉ. रामचंद्र राठोड, डॉ. सातपुते, डॉ. भोंगाडे, डॉ. ताटेवाड यांनी रुग्णांची तपासणी केली. यशस्वीतेसाठी सरपंच जांबुवंत राठोड, शेषराव राठोड, संजय डोईफोडे, विष्णू चव्हाण, साहेबराव चव्हाण, नामदेव राठोड, बबन चवरे, मनोज आडे, नंदेश चव्हाण, सुनील ढाले, प्रदीप राठोड यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)