शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदारांच्या वाहनावर चढला वाघ

By admin | Updated: September 22, 2016 01:27 IST

वरुड रस्त्यावरील जंगल. वेळ रात्री ८ वाजताची. पट्टेदार वाघ अचानक वाहनापुढे उभा. चालकाने प्रसंगावधान राखून वाहनाच्या काचा वर चढविल्या.

वरुडचा थरार : दहा मिनिटे दिला ठिय्याअशोक पिंपरे  राळेगाव स्थळ : वरुड रस्त्यावरील जंगल. वेळ रात्री ८ वाजताची. पट्टेदार वाघ अचानक वाहनापुढे उभा. चालकाने प्रसंगावधान राखून वाहनाच्या काचा वर चढविल्या. धिप्पाड वाघ दोनदा वाहनावर चढला. दहा मिनिटे ठिय्या देऊन जंगलात मार्गस्थ झाला. हा थरार मंगळवारी रात्री विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके यांनी अनुभवला. यामुळे या परिसरात पट्टेदार वाघाचा संचार असण्यावरही शिक्कामोर्तब झाले. प्रा. वसंतराव पुरके मोहदा येथून मंगळवारी रात्री राळेगावकडे येत होते. वरुडलगतच्या जंगलातून रस्त्यावर अचानक पट्टेदार वाघ आला. धिप्पाड वाघ पाहून वाहन चालकाची पाचावरण धारण बसली. मात्र प्रसंगावधान राखून त्याने वाहन थांबवित तत्काळ काचा वर केल्या. वाहनात प्रा. पुरके आणि त्यांचे पाच कार्यकर्ते होते. एक-दोन मिनिटात वाघ निघून जाईल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र या वाघाने तब्बल दहा मिनिट तेथेच तळ ठोकला. दोनदा वाहनावर चढला. एकदा तर प्रा.पुरके बसलेल्या खिडकीजवळ जाऊन काचेतून पाहू लागला. हा घटनाक्रम सुरू असतानाच प्रा. पुरके यांनी वन विभागाशी संपर्क साधला. या भागात वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत आहे. दोघांना जीव गमवावा लागला. आज माझ्या वाहनापुढे वाघ आला. आपणही वाघाचे भक्ष झालो असतो. त्यामुळे वाघ पकडण्याची मोहीम अधिक तीव्र करा, अशी सूचना दिली. दरम्यान काही वेळाने हा वाघ रस्त्याच्या कडेने चालत जंगलात लुप्त झाला. या भागात पट्टेदार वाघ असल्याचे परिसरातील नागरिक सांगत होते. अनेकांनी याची धास्तीही घेतली आहे. दुचाकीने तर जाणेच बंद झाले आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. विलक्षण योगायोग प्रा.वसंतराव पुरके खैरगाव कासार येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात असताना वरुड जवळ त्याच पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. हा विलक्षण योगायोग पुरके यांना अनुभवावा लागला.