शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
3
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
4
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
5
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
6
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
7
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
8
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
9
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
10
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
11
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
12
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
13
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
14
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
15
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
16
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
17
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
18
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
19
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
20
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

माजी नगराध्यक्षांनी वाचला नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचा पाढा

By admin | Updated: February 3, 2016 02:40 IST

यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी आज पत्रपरिषदेत पाढाच वाचला.

बाळासाहेब चौधरी : आजी-माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळातील प्रकरणेयवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी आज पत्रपरिषदेत पाढाच वाचला. नगरपरिषदेमध्ये विकास निधीचा अपहार असून खोट्या देयकांद्वारे तो करण्यात आल्याचा आरोप करत चौधरी यांनी माजी नगराध्यक्ष योगेश गढिया व विद्यमान नगराध्यक्ष सुभाष राय यांच्या कार्यकाळातील ही प्रकरणे असल्याचे सांगितले. नगरपरिषदेतील ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार भवनात संवाद साधला. त्यांनी यावेळी नगरपरिषदेतील चुकीची ध्येय धोरणे, रखडलेला विकास, शासकीय निधीतील अपहार, त्यात काही सदस्य व अधिकाऱ्यांचा सहभाग अशा विविध मुद्यांना हात घातला. चौधरी म्हणाले, शहराच्या विकासाला २०१० नंतर उतरती क ळा लागली आहे. पुर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात केंद्र व राज्यशासनाकडून विकास निधी प्राप्त झाला आहे. मात्र हा निधी खर्च होऊनही कोणताच बदल शहरात झाला नाही. इतकेच काय तर घनकचऱ्याची आजही बिकट स्थिती आहे. कोट्यावधींचे घनकचरा सफाई कंत्राट देऊन वित्त आयोगातील सात कोटींवर रक्कम यामध्ये खर्च करण्यात आली आहे. २०१२-२०१३ या दोन वर्षातील विविध बोगस देयकांची माहिती अधिकारातंर्गत माहिती घेतली आहे. पालिकेतील पाणीपूरवठा विभाग, बाजार विभाग, आरोग्य विभाग, नियोजन विभाग आणि बांधकाम विभागात सर्वाधिक अनियमितता झाली आहे. सध्यातर गेल्या काही वर्षांपासून कोणतीही पात्रता नसलेल्या लिपिकाला पाणीपूरवठा, बाजार विभाग आणि आरोग्य विभागाचा प्रमुख बनविण्यात आले आहेत. त्याच्याकडून हा बोगस बिल काढण्याचा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू आहे. या भ्रष्टाचारात काही नगरसेवकही लिप्त असून अधिकाऱ्यांनीसुध्दा आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. याची तक्रार तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे केली होती. नंतर कलम ३०८ नुसार याचिका दाखल केली. मात्र यावर कोणतीच कारवाई झाली नाही. आता २०१५ पर्यंत काढण्यात आलेल्या सर्वच बिलांची माहिती अधिकारात माहिती मागविली आहे. त्यानंतर स्थानिक आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास दोन महिन्याच्या कालावधीनंतर थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले. पालिकेत सर्वाधिक अपहार हा शहर स्वच्छतेच्या कंत्राटातून केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाने अनेक टॅँकर, विंधन विहिरी लावल्याची खोटी बिल काढली आहेत. आरोग्य विभागाकडून औषध खरेदी, सफाईच्या सुविधा, घंटागाड्या याच्या नावाखाली हजारोंच्या रकमेतील कोट्यवधीची बिले काढण्यात आली आहे. आजही हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. तत्कालीन नगराध्यक्ष योगेश गढीया यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही पध्दत नगराध्यक्ष सुभाष रॉय यांच्याही काळात अव्याहतपणे सुरूच आहे. नुकताच खामगाव नगरपरिषदेतील अपहार प्रकरणात तेथील माजी नगराध्यक्षाला अटक झाली. यवतमाळ पालिकेतील भ्रष्टाचार याहीपेक्षा गंभीर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी केल्यास धक्कादायक वास्तव पुढे येऊ शकते, असेही बाळासाहेब चौधरी म्हणाले. (कार्यालय प्रतिनिधी)