शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

माजी आमदार बापूराव पानघाटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:19 IST

वणी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार बापूराव हरबाजी पानघाटे यांचे बुधवारी रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार बापूराव हरबाजी पानघाटे यांचे बुधवारी रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.तालुक्यातील कोलगाव (साखरा) या त्यांच्या मूळ गावच्या सरपंच (१९६२-६७) पदापासून त्यांच्या राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. त्यानंतर वणी पंचायत समितीचे उपसभापती (१९६५-६६), सभापती (१९६६-१९७२), यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य (१९७२), उपाध्यक्ष (१९७७) अशी पदे भूषवून ते १९७८ मध्ये वणी विधानसभेचे आमदार झाले. १९८५ पर्यंत त्यांनी विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर १९९० ते २००२ पर्यंत वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, तालुका खविसंचे संचालक, कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक (१९९३-९४) असा त्यांचा चढता राजकीय जीवनपट राहिला. ते येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते, तर धनोजे कुणबी संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे. येथील मोक्षधामात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र चोपणे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी मंत्री वंसत पुरके, शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, सुदर्शन निमकर, अ‍ॅड.वामनराव चटप, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, नरेंद्र ठाकरे, संजय देरकर, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. आ.बाळू धानोरकर, माजी आमदार विश्वास नांदेकर, अ‍ॅड.देविदास काळे, सुनील कातकडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. संचालन राजेश पोटे यांनी केले, तर अ‍ॅड.विनायक एकरे यांनी प्रास्ताविक केले.